Varsha Gaikwad : ‘भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी हवी होती'

राजकारणात प्रत्येकास अपेक्षा असते, ती असणे काही चुकीचे नाही. पण भुजबळांनी आधी शिवसेना सोडली, नंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी सोडली. आता जनता सर्व काही समजत आहे.
varsha gaikwad
varsha gaikwadSakal
Updated on

नांदेड - ‘नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा विजय निश्चित होता. मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यातील व राज्यातील राजकारणाचे बदललेले वारे ओळखले आहे त्यामुळेच ते आता राज्यसभा मागत असावेत, परंतु हा त्यांच्या पक्षांतील अंतर्गत प्रश्न आहे. अजित पवार म्हणाले, की आमच्यात मतभेद नाहीत.

राजकारणात प्रत्येकास अपेक्षा असते, ती असणे काही चुकीचे नाही. पण भुजबळांनी आधी शिवसेना सोडली, नंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी सोडली. आता जनता सर्व काही समजत आहे. त्यामुळेच ते राज्यसभा मागत असावेत’, असा टोला कॉँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड यांनी भुजबळांना शनिवारी लगावला.

खासदार गायकवाड तेलंगणातील कौटुंबिक कार्यक्रमात जाण्यासाठी शनिवारी (ता. १५) पहाटे नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, की वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर आमच्या समाजाचे नेते आहेत. माझे पक्षातील आणि मुंबईतील काम पहा. हे काम पाहून तरी बाळासाहेब आंबेडकरांनी मला पाठिंबा द्यायला हवा होता. परंतु, दुर्दैवाने तसे झाले नाही.

नांदा सौख्यभरे...चव्हाणांनी आनंदात राहावे

वर्षा गायकवाड म्हणाल्या की मला आनंद यांचा वाटला की अशोक चव्हाणांसारखा नेता भाजपमध्ये जाऊनही येथील जनतेने कॉँग्रेसला निवडून दिले. नेते गेले तरी जनता ही विचारांबरोबर असते, हे नांदेडकरांनी दाखवून दिले. कांही नेते आपापल्या स्वार्थासाठी पक्षबदल करत असतात. जनता मात्र सत्यासाठी, लोकशाहीसाठी जागृत असते. जनतेने जे उत्तर द्यायचे ते दिले.

या निवडणुकीत एक दिसून आले, की तुम्ही जरी पक्ष बदलले तरी, लोकांना जे स्वीकारायचे ते स्वीकारणार. दुर्दैवाने आजच्या कलुषित वातावरणास नरेंद्र मोदी व अमित शहा हे जबाबदार आहेत. जे पक्ष सोडून गेले, त्यांना ‘नांदा सौख्यभरे...’ जिथे आहात तिथे आनंदात राहावे. आम्ही नवीन कार्यकर्त्यांना घेऊन काम करत आहोत. कार्यकर्ते उदयास येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.