बियाणींची गोळ्या झाडून हत्या; संपत्तीवर पत्नीशिवाय आणखी एका महिलेचा वारसदार म्हणून दावा

Sanjay Biyani Murder case
Sanjay Biyani Murder caseesakal
Updated on
Summary

उद्योजक संजय बियाणी यांची काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

नांदेड : येथील प्रसिद्ध उद्योजक संजय बियाणी (Sanjay Biyani Murder case) यांची काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी तीन आरोपींवर मोक्का (Mocca) लावण्यात आलाय. यापूर्वी 9 जणांना अटक करण्यात आली होती. तीन दिवसांपूर्वी आणखी दोन आरोपी मध्य प्रदेशमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दोन दिवसांपूर्वी नांदेडमधील पौर्णिमानगर येथून रणजित मांजरमकर याला अटक (Arrest) करण्यात आलीय. त्यानंच बियाणी यांच्या घराची रेकी केली होती आणि मारेकऱ्यांना शस्त्र पुरवले होते.

संजय बियाणी यांच्या हत्येनं नांदेड जिल्ह्यासह (Nanded News) महाराष्ट्रात खळबळ माजली होती. नांदेड जिल्ह्यातील उद्योजक, क्लासेस चालक, डॉक्टर, यांच्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर अनेक व्यावसायिक व उद्योजकांनी आपले उद्योग गुंडाळून नांदेड शहर सोडले आहे. दरम्यान संजय बियाणी यांची हत्या करून मारेकरी पळ काढण्यात यशस्वी झाले होते. त्यासाठी पोलिसांनी SIT गठीत करून SIT चे तीन पथके पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, तेलंगणा,आंध्रप्रदेश या विविध राज्यात तपासासाठी रवाना करण्यात आली होती. परंतु, दोन महिने उलटूनही पोलिसांना आरोपींचा तपास लागत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर संशय घेतला जात होता.

तर, संजय बियाणी यांच्या तपासाविषयी पत्नी अनिता बियाणी आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आक्षेप घेत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. हत्या होऊन तब्बल 55 दिवसानंतर आरोपीचा शोध लावण्यात नांदेड पोलिस यशस्वी ठरले होते. नांदेड पोलिसांनी 55 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर हरियाणा, पंजाब, नांदेड, उत्तर प्रदेश, तेलंगणा या राज्यातून आतापर्यंत 11 आरोपींना ताब्यात घेतलंय. दरम्यान, आता संजय बियाणींच्या हत्येनंतर आता नवा ट्वीस्ट याप्रकरणी पाहायला मिळालाय. संजय बियाणींच्या हत्येनंतर आता त्यांच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण, यावरुन चर्चांना उधाण आलंय. संजय बियाणी यांची पत्नी अनिता यांनी वारसदार म्हणून न्यायलयात आधीच दावा केला होता. मात्र, अन्य एका महिलेनं यावर आक्षेप नोंदवलाय.

Sanjay Biyani Murder case
Amul : अमूलसह 'या' कंपन्यांना मिळणार का दिलासा? सरकार आपल्या निर्णयावर ठाम

या महिलेनं आपली चार वर्षांची मुलगी संजय बियाणींच्या संपत्तीची वारसदार असल्याचा आक्षेप नोंदवलाय. यामुळं बियाणी कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आलंय. न्यायालयात याप्रकरणी 24 जून रोजी आता पुढील सुनावणी पार पडेल. या सुनावणीकडं संपूर्ण नांदेड जिल्ह्याची नजर लागलीय. संजय बियाणींची गोळ्या घालून दिवसा ढवळ्या हत्या करण्यात आली होती. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या या हत्याकांडानंतर नांदेड पोलिसांनी (Nanded Police) महिन्याभरात या हत्येचा छडा लावला होता.

Sanjay Biyani Murder case
PHOTO : आसाममध्ये पुरानं केला विध्वंस; आतापर्यंत 54 लोकांचा मृत्यू

असली वारसदार कोण?

व्यावसायिक संजय बियाणी यांच्या संपत्तीचा वारसदार कोण, यावरुन आता सवाल उपस्थित होत आहेत. हे संपूर्ण प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. याशिवाय आणखी एका महिलेनं वारसदार असल्याचा दावा केलाय. त्यामुळं कोर्टात आता नेमका काय युक्तिवाद होतो, याकडंही सगळ्यांचं लक्ष लागलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.