Nanded News : रब्बी हंगामातील पिकांसाठी थंडी पोषक

वाढलेली थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी लाभदायक व पोषक ठरत आहे.
nanded
nandedsakal
Updated on

मारतळा : मागील आठ दिवसांपासून मारतळ्यासह परिसरात थंडीचा कडाका वाढला असून रात्रीच्या तापमानात घट झाल्याने सायंकाळी व पहाटे, सकाळच्या सुमारास वातावरणात कडाक्याची थंडी जाणवत आहे. वाढलेली थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी लाभदायक व पोषक ठरत आहे.

वातावरणात थंडीचे प्रमाण अधिक जाणवत असल्यामुळे नागरिकांकडून उबदार कपड्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे थंडीपासून बचावासाठी शेकोटीची उब घेताना नागरिक दिसून येत आहेत. या थंडीमुळे पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचेही दिसून येत आहे. या थंडीपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी लहान मुले, स्त्री, पुरुष व वृद्ध स्वेटर मफलर, जॅकेटचा मोठ्या प्रमाणात उपयोग करत आहेत.

लहान मुलांपासून ते ज्येष्ठापर्यंत प्रत्येक जण उबदार कपडे परिधान करण्याला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. हिवाळा हा आरोग्याच्या दृष्टीने उत्साहवर्धक असल्याने थंडीचा आनंद घेण्यासाठी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी व खरीपातील तूर पिकासाठी वाढणारी थंडी अत्यंत लाभदायक आहे

तुरीच्या दुसऱ्या बहरांसाठी लाभदायक

खरीपातील तूर पिकांचे पहिला बहार हा ढगाळ वातावरण व धुक्यामुळे पूर्ण फुलोरा गळून गेला. तर काहींचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. मात्र आता या थंडीमुळे येणारा दुसऱ्या तूर पिकांचा बहारासाठी ही थंडी पोषक असल्याचे जाणकारांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.