नांदेड : शुक्रवार (ता. सहा) नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 56 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 41 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 21 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 20 बाधित आले.
आजच्या एकुण 1 हजार 96 अहवालापैकी 1 हजार 48 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 19 हजार 378 एवढी झाली असून यातील 18 हजार 255 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 436 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 24 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.
जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 521 झाली
आज रोजी प्राप्त अहवालानुसार दोन रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गुरुवार 5 नोव्हेंबर 2020 रोजी बिलालनगर नांदेड येथील 60 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे, शुक्रवार 6 नोव्हेंबर 2020 होळी नांदेड येथील 80 वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 521 झाली आहे.
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.66 टक्के
आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 13, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 17, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 2, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 11, खाजगी रुग्णालय 8, बिलोली कोविड केअर सेटर व गृहविलगीकरण 4 असे एकूण 56 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.66 टक्के आहे.
आरटीपीसीआर तपासणीद्वारे
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 16, हदगाव तालुक्यात 1, मुखेड 3, देगलूर 1 असे एकुण 21 बाधित आढळले.
अँटिजेन तपासणीद्वारे
तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 7, मुदखेड तालुक्यात 5, देगलूर 2, हिमायतनगर 1, नांदेड ग्रामीण 1, भोकर 2, कंधार 1, परभणी 1 असे एकूण 20 बाधित आढळले.
जिल्ह्यात 436 बाधितांवर औषधोपचार सुरु
जिल्ह्यात 436 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 67, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 29, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 42, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 138, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 5, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 23, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 10, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 5, लोहा कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 8, बिलोली कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 17, भोकर कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 17, बारड अंतर्गत गृह विलगीकरण 1, धर्माबाद तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, हिमायतनगर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 3, कंधार तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4, मांडवी अंतर्गत गृह विलगीकरण 1, अर्धापूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 17, मुदखेड तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, खाजगी रुग्णालय 51 आहेत.
उपलब्ध खाटांची संख्या
शुक्रवार 5 नोव्हेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 145, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 72 एवढी आहे.
आकडे बोलतात
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल,
डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा शल्यचिकित्सक, नांदेड
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.