कोरोना रुग्णांबाबत दयाभाव :  लोहा येथील एबीसी ग्रुपचा मदतीचा हात 

file photo
file photo
Updated on

लोहा (जिल्हा नांदेड) : कोविड संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. जिकडे तिकडे रुग्णसंख्या वाढते आहे.  अशा  भीतीयुक्त वातावरणात रुग्णांप्रति दयाभाव दाखवून आरोग्य सुविधा देणारे एबीसी ग्रुपचे लोह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

लोहा  शहरातील जिल्हा उपविभागीय  रुग्णालयात  उपचार घेत असलेल्या  कोरुना रुग्ण प्रति दयाभाव दाखवत एबीसी ग्रुपचे  अमोल चव्हाण यांनी गरजू रुग्णांना अन्नपुरवठा विशेषतः सनीटायजर ,अंडी यासारख्या जीवनावश्यक वस्तू भेट दिल्यामुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे.एबीसी ग्रुपने  यापूर्वी पुणे, नांदेड,कंधार,  दिल्ली येथील झोपडपट्टीतील मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था व शैक्षणिक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी मोठा पुढाकार घेतला होता.

आपला जीव धोक्यात घालून लोकांसाठी काम करत आहेत

लोहा शहरात गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्स पाळा. हात धुवा.  भरपूर पाणी प्या . भाजीपाला व फळे खा.' कोरणा हा आजार दुर्धर नाही, त्यावर मात करता येऊ शकते.' यासारखे जनजागरण एबीसी ग्रुपने प्रत्येक प्रभाग निहाय केल्यामुळे अल्पावधीतच या ग्रुपचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपण आपल्याच लोकांना प्रोत्साहन नाही देणार तर कोणाला देणार? आज एबीसी ग्रुपने कार्यकर्ते  आपला जीव धोक्यात घालून लोकांसाठी काम करत आहेत.

विद्यार्थांना शाळेत लागणाऱ्या वस्तू ही दिल्या गेल्या

एबीसी  ग्रुपने कोरोना च्या काळात, गरीब व गरजू लोकांना अन्न पुरवण्यापासून, मास्क देण्या पासून व लोकांमध्ये जन जागृती निर्माण केली. एवढंच न्हवे तर ह्या हलाखीच्या परिस्थितीत विद्यार्थांना शाळेत लागणाऱ्या वस्तू ही दिल्या गेल्या आहेत. रुग्णालयात अंडी, बिस्कीट, श्यानिटायजर  स्वतः जाऊन देतात, आनंद वाटतो. आपल्या लोह्याच्या च जनतेसाठी मदतीचा हात देत आहेत. ह्यांचं अभिनंदन करणे हे माझं आणि माझ्या परिवाराच कर्तव्य आहे. 

जीवनपध्दतीत बदल करा

"आजच्या ह्या  बिकट परिस्थितीत आपण सर्व जण एकत्रित येऊन  कोविड  संसर्गजन्य आधारावर मात करता येते. जीवनपध्दतीत बदल करा. हा एक नवीन विचार आणला पाहिजे जो विचार समाजातल्या प्रत्येक घटकासाठी असावा."

अमोल गायखर- सामाजिक कार्यकर्ते,  लोहा.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.