नांदेड : समाजातील विविध जाती-धर्मातील रंजल्या गांजलेल्यांना निःस्वार्थ भावनेने मदत करून त्यांना जगण्यासाठी आशेचा किरण दाखविणारा ‘साईप्रसाद’ प्रतिष्ठान. ११ जुलै २०१२ रोजी प्रतिष्ठानची स्थापना झाल्यापासून ‘साईप्रसाद’चे ‘नाथ’ अखंडित सेवा देत आहे.
रंजल्या गांजलेल्यांना जगण्यासाठी आशेचा किरण दाखविण्याच्या हेतूने ‘साईप्रसाद’ची स्थापना झाली. त्यात ना अध्यक्ष ना सचिव कुठलाही पदाधिकारी नाही. सेवाकार्यासाठी पैसा न घेता सेवा ही वस्तू स्वरूपात घेतली जाते. परिवारात सद्यस्थितीत महाराष्ट्रासह, विदेशात स्थाईक भारतीय नागरिक निःस्वार्थ भावनेने सहभागी होत आहेत. २०१२ मध्ये लावलेल्या या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे.
शासकीय रुग्णालयात अविरत सेवा
शहरातील गुरुगोविंदसिंग शासकीय रुग्णालयात खिचडी वाटपापासून सेवाकार्याला सुरुवात धाली असून, आठ वर्षांपासून ही सेवा अविरत सुरु आहे. सध्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात येणाऱ्या १२०० रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना दररोज सकाळी खिचडी व सायंकाळी भाजी,पोळी, वरण व भात दिला जातो. शिवाय दोन पाणी फिल्टर प्लांटही उभारण्यात आला असून, दररोज १२००० लिटर शुद्ध पाण्याचे मोफत वाटपही केले जाते.
पूरपरिस्थितीतही मदतीचा हात
सांगली-कोल्हापूर येथील पूरपरिस्थितीमुळे हतबल झालेल्या कुटुंबाच्या मदतीसाठी साईप्रसादचे १५० ‘नाथ’ नांदेडहून चार दिवसासाठी गेले होते. संसारोपयोगी साहित्य, कपडे, अन्नधान्य, शैक्षणिक साहित्य देण्यासोबतच सुखवाडी (जि.सांगली) येथील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छता व घर सावरण्यासाठी सहकार्य केले. सुखवाडीतील १५०० गावकऱ्यांना सकाळी चहा-नाश्ता, दुपारी व सायंकाळी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
हे देखील वाचाच - विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी पाठ्यपुस्तकांची फेररचना
लॉकडाउनमध्येही निःस्वार्थ सेवा
कोरोनाच्या भीषण संकट काळातही न घाबरता साईप्रसादने शासन परवानगी व निर्देशानुसार मदत कार्य केले. कोरोना वार्डातही मदत केली. लॉकडाउन काळात अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती. अशा कुटुंबांना दोन महिने पुरेल एवढे अन्नधान्य कीटचे वाटप केले. गुरु गोविंदसिंग रुग्णालयातील १७ नर्सेसना २० हजार रुपयांची मदत केली. मिझोरम येथील मुलींना नागपूरपर्यंत जाण्यासाठी १५ हजार रुपयांची मदत केली.
आठ वर्षात काय केले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.