नांदेड-वाघाळा महापालिका पोटनिवडणुकीत कॉँग्रेस विजयी

एमआयएमचे उमेदवार रेश्मा बेगम सलीम बेग यांचा २ हजार ००५ मतांनी पराभव केला.
नांदेड-वाघाळा महापालिका
नांदेड-वाघाळा महापालिकाsakal
Updated on

नांदेड : नांदेड-वाघाळा(Nanded Waghala) महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ ‘अ’ (चौफाळा, मदिनानगर) पोटनिवडणुकीत बुधवारी (ता. २२) काँग्रेसच्या(Congress) उमेदवार मुस्कान नाज सय्यद वाजीद यांनी विजय मिळवला. त्यांनी एमआयएमचे उमेदवार रेश्मा बेगम सलीम बेग यांचा २ हजार ००५ मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक १३ ‘अ’ (चौफाळा, मदिनानगर) पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी आठ हजार ३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

मतदानाची टक्केवारी ३७.४७ टक्के होती. बुधवारी (ता. २२) सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. एकूण चार टेबलवर सात फेऱ्यांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. काँग्रेसच्या उमेदवार मुस्कान नाज सय्यद वाजीद यांना चार हजार २३० मते मिळाली. एमआयएमचे उमेदवार रेश्मा बेगम सलीम बेग यांना दोन हजार २२५ तर भाजपच्या उमेदवार लक्ष्मीबाई जोंधळे यांना एक हजार ४९० मते मिळाली. नोटाला (वरीलपैकी एकही नाही) ९४ मते मिळाली.

नांदेड-वाघाळा महापालिका
टीईटीची ऑक्टोबरमध्ये झालेली परिक्षाही संशयाच्या फेऱ्यात

फुलंब्रीत महाविकास आघाडी

फुलंब्री : नगरपंचायतीच्या दोन वॉर्डासाठी पोटनिवडणूक झाली. यात महाविकास आघाडी विजयी यश मिळाले. वॉर्ड क्रमांक दोनमध्ये झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा आनंदा ढोके या केवळ दोन मतांनी विजयी झाल्या. वॉर्ड क्रमांक आठमध्ये शिवसेनेच्या अर्चना उमेश दुतोंडे ४३४ मतांनी विजयी झाल्या.

सिल्लोडमध्ये शिवसेना

सिल्लोड : नगरपरिषदेसाठी प्रभाग क्रमांक १२ मध्ये एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली. यात शिवसेनेच्या उमेदवार पठाण फातमाबी जब्बार खान यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करीत विजय मिळवला. त्यांना २०१९ मते मिळाली. शिवसेना, भाजप, काँग्रेस, वंचित आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेससह दोन अपक्ष उमेदवार रिंगणात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.