Nanded : कलामंदिर नाट्यगृहाचे बांधकाम रखडले; वाढीव आसनक्षमतेसह अद्ययावत नाट्यगृहाची रंगकर्मींची मागणी

नाट्यप्रेमींना एक व्यासपीठ म्हणून कलामंदिरची निर्मिती करण्यात आली, परंतु कलामंदिर हे आता जमीनदोस्त झाले असून या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्सची उभारणी केली जात आहे.
construction of Kalamandir theater stop actors demand up-to-date theater with increased seating capacity
construction of Kalamandir theater stop actors demand up-to-date theater with increased seating capacitySakal
Updated on

- गौरव वाळिंबे

Nanded News : नांदेड हा गोदाकाठी वसलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातून अनेक कलावंत छोट्या, मोठ्या पडद्यावर झळकत आहेत. शहरात मराठी नाट्य परंपरा प्रबळ असून या चळवळीत नांदेडचे नाव अग्रेसर आहे.

नाट्यप्रेमींना एक व्यासपीठ म्हणून कलामंदिरची निर्मिती करण्यात आली, परंतु कलामंदिर हे आता जमीनदोस्त झाले असून या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्सची उभारणी केली जात आहे. परंतु, या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये कमी पाचशे आसन क्षमतेचे नाट्यगृह उभारले जात असल्याचे समजते. यामुळे नाट्यप्रेमींमध्ये तीव्र नाराजी आहे.

या ठिकाणी आठशे ते एक हजार आसन क्षमतेचे नाट्यगृह उभारले जावे, अशी मागणी नाट्यप्रेमींकडून होत आहे. इथे वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक, संगीताचे कार्यक्रम, नृत्य प्रस्तुती आणि अन्य सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जातात.

या कार्यक्रमांमुळे स्थानिक संस्कृतीचा विकास होतो आणि नवीन कलावंतांना प्रोत्साहन मिळते म्हणून या ठिकाणी प्रशस्त नाट्यगृह असावे अशी नाट्यप्रेमींची मागणी आहे. कलामंदिराच्या जागी मोठे कॉम्प्लेक्स उभारले जात आहे, परंतु त्या ठिकाणी कमी आसन क्षमतेचे प्रेक्षागृह निर्माण केले जात असल्यामुळे त्या ठिकाणी व्यावसायिक नाटक चालवणे शक्य होणार नाही.

त्यामुळे ते फक्त छोट्या-मोठ्या कार्यक्रमासाठी, बैठकांसाठी त्या प्रेक्षागृहाचा वापर होईल, अशी अनेक नाट्यप्रेमींची तक्रार आहे. रंगकर्मींच्या मते, या जागी अद्ययावत मोठे प्रशस्त नाट्यगृह न झाल्यास सांस्कृतिक चळवळीस धक्का बसणार आहे.

कलामंदिरच्या जागी मोठे कॉम्प्लेक्स उभारले जावे, परंतु त्या ठिकाणी कमी आसन क्षमतेच्या निर्णयामुळे स्थानिक रंगकर्मींमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. कलामंदिर हे स्थानिक सांस्कृतिक धरोहराचे प्रतीक असून, तेथील कार्यक्रम आणि उपक्रमांनी कलाकारांना एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. रंगकर्मींच्या मागण्यांचा आदर करून प्रशासनाने योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. सांस्कृतिक परंपरेचे संरक्षण करणे, स्थानिक कला आणि कलाकारांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे.

कलावंतांची अडचण

अनेक स्थानिक कलाकारांना कलामंदिरच्या माध्यमातून आपली कला सादर करण्याची संधी मिळते. मोठे कॉम्प्लेक्स उभारल्याने या कलाकारांना त्यांच्या कलांचे प्रदर्शन करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळणार नाही. कलामंदिरच्या जागी कॉम्प्लेक्स बांधल्यास, कलावंतांसाठी पर्यायी स्थळांची कमतरता निर्माण होईल. त्यामुळे रंगकर्मी त्यांच्या कलात्मक उपक्रमांसाठी योग्य ठिकाणांच्या शोधात अडचणीत येतात.

कलामंदिरात किमान १०००-१२०० क्षमतेची आसन व्यवस्था असावी कारण कमी क्षमतेच्या नाट्यगृहात व्यावसायिक नाटक आयोजित करणे परवडणार नाही.

- गोविंद जोशी, (ज्येष्ठ रंगकर्मी)

कलामंदिरात किमान अधिकच्या आसन क्षमतेसह नाट्यगृह उभरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही तांत्रिक अडचणी दूर झाल्यावर लवकरच बांधकामास सुरवात होईल.

- डॉ. हंसराज वैद्य, अध्यक्ष, कलामंदिर संस्था, नांदेड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.