नांदेड: कोरोना विषणूंचे संक्रमण रोखण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर शानाच्या मार्गदर्शक सूचनांची आंमलबजाणी करण्यात येत आहे. गावपातळीवर ग्रामसुरक्षा कवच (समिती) मार्फत बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्य नागरिकांवर वॉच ठेवण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून ग्रामपंचायतींना निर्जंतुकीकरणाचे सक्त आदेश देण्यात आले आहेत. कोरोना विषाणूंची लक्षणे समोर येण्यासाठी गावखेड्यांतील सरसकट बालक, ज्येष्ठ नागरिकांचे कोरोना सर्वेक्षण करण्यात येणार आहे .
कोरोना महारीच्या पार्श्वभूमीवर पुणे, मुंसईसह राज्यातील इतर महानगरांतून आनेक नागरिक गावी परतले आहेत. लॉकडाउनमध्ये सवलतीनुसार इतर जिल्ह्यांतून नागरिकांचे लोंढे ग्रामीण भागात दाखल होत आहेत. कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी गावपातळीवर ग्रामसुरक्षा कवच समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यामध्ये आशा वर्कर, आंगणवाडी कर्मचारी, आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांना समितीमार्फत सोईनुसार घरी, शाळा, समाजमंदिर आदी सार्वजनिक ठिकाणी क्वारंटाइन करण्यात येत आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गावखेड्यात आठवड्यातून एक वेळा निर्जंतुकीकरणाचे ग्रामपंचायतींना जिल्हा परिषद प्रशासनाकडून सक्त आदेश देण्यात आले आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने नियुक्त अशा, आंगणवाडी कर्मचारी, शिक्षक आदी कारोना वॉरियर्स घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याविषयी चौकशी व तपासणी करीत आहेत. दरम्यान, गावच्या वेशीतच कोरोनाची संक्रमण साखळी खंडित करण्यासाठी लक्षणं अढळून येणाऱ्या रुग्णांची तत्काळ आरोग्य विभागास माहिती देऊन संबंधित नागरिकास विलगीकरण करण्याचे अधिकार दक्षता समित्यांना देण्यात आले आहेत.
कोरोना महामारीचे लक्षणे समोर येण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायत कार्यालयामार्फत फ्रंट लाईन कोरोना वॉरियर्स ‘ आशा’ वर्कर यांना सर्वेक्षण किट वाटपाचा निर्णय घेतला आहे. कोरोना महामारीच्या गांभीर्यानुसार गावखेड्यांतील सरसकट शून्य ते दहा वर्षे वयाचे बालक, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहेत.
येथे क्लिक करा- चिमुकल्या हातांनी रेखाटले पर्यावरणाचे महत्व
आशा वर्कर यांना वाटप करण्यात येणाऱ्या साहित्य किटमध्ये थर्मल स्कॅनर, पल्स ॲक्सोमीटर, ग्लुकोमीटरसह सुरक्षेच्या साधनांचा समावेश आहे. त्यानुसार आशा वर्कर, अंगणवाडी कर्मचाऱ्यांमार्फत कोरोना लक्षणं जसे तापमान, ऑक्सिजन, शुगरची तपासणी करण्यात येणार आहे. कुटुंबातील प्रत्येक बालक, ज्येष्ठ नागरिकाच्या तपासणीसाठी आशा वर्कर, आंगणवाडी कर्मचाऱ्यांना तालुका स्तरावर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण देण्यात येत आहे.
ग्रामपंचायत कार्यालयांना स्वच्छता, कचारा व्यवस्थापनासह निर्जंतुकीकरणाचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील एक हजार ५०० वर आशा वर्कर यांना ग्रामपंचायतीर्मात तपासणी किट वाटप करण्यात येणार आहेत.
व्ही. आर. कोंडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.