नांदेड : भारतीय संस्कृतीमधील सर्वात मोठा सण, उत्सव म्हणून देशभरात दिवाळी सन साजरा केला जातो. मातीपासून रंगी बेरंगी खेळ - भांडी घडविणारा कुंभार बांधव दिवाळी सहा महिण्यांवर असल्यापासून घरबाळांसह मातीच्या वस्तू तयार करण्यात गुंतलेला असतो. यंदाही कुंभार व्यवसायीक बांधवांनी सहा महिने कष्टून मातीची अकर्षक, देखणी खेळ भांडी तयार केली असली, तरी कोरोनामुळे दिवाळी काही दिवसांवर आली असताना कुंभाराच्या खेळ भांड्यांना पूर्वी प्रमाणे मागणी होत नसल्याने व्यवसाय चांगलाच अडचणीत सापडला आहे.
दरवर्षी खेळ भांड्यातून लाखोंची उलाढाल होते. यंदा मात्र पहिल्यांदाच या व्यवसायावर लक्ष्मी नाराज असल्याने व्यवसायीक आर्थिक संकटात सापडला आहे. नांदेड जिल्ह्यात पारंपारीक कुंभार कला जोपासणारे पन्नासपेक्षा अधिक व्यवसायीक आहेत. कधी काळी घरातील प्रत्येक सण, वार, आनंद इतकेच काय तर दु:खाच्या काळातही कुंभारने घडविलेल्या वस्तू कामास येत असतात. आजही त्यांची मागणी कमी झालेली नाही. परंतू काळानुसार लोकांच्या आकड्यात बदल होत असल्याने दिवसेंदिवस कुंभार कला जोपासणाऱ्या समाजाच्या कलेवर मर्यादा येत आहेत. परिणामी कुंभार समाजाला बदल स्विकारणे अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे मातीची भांडी बनविणारे हे कारागीर आता मुर्ती घडविण्यातही अग्रेसर दिसून येत आहेत.
हेही वाचा - वर्धापन विशेष- भारत स्काऊटस् आणि गाईड चळवळ सर्व स्तरापर्यंत पोहचवा- दिगंबर करंडे
कोटींचा व्यवसाय लाखांवर
टाळेबंदीमुळे व्यवसाय पूर्णपणे बंद होता. त्यामुळे टाळेबंदीपूर्वी तयार करण्यात आलेले साहित्य तसेच पडून आहे. आगामी दिवाळी सणानिमित्त तयार केलेल्या महालक्ष्मीच्या मुर्त्या देखील यंदा तयार करण्यात आलेल्या नाहीत. रंग व माती महाग झाली असल्याने या व्यवसायीकांनी देखील कमी प्रमाणात मुर्त्या बनविल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी अडीच ते तीन कोटींची होणारी उलाढाल यंदा मात्र लाखात आली आहे.
यंदा उत्पन्न कमीच
जिल्ह्यात कुंभार कारागीरांची संख्या बऱ्यापैकी आहे. परंतु सर्वांची परिस्थिती जेमतेम आहे. व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी लागणारा पैसा नसल्यामुळे यंदा दिवाळीसाठी लागणारे दिवे, पणत्या, रांगोळी, दिवे, दीपमाळ, सुगडे मोजक्या प्रमाणात तयार केल्या आहेत. त्यामुळे उत्पन्न कमीच होणार आहे.
- रामलाल बगळे, वसमत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.