नांदेड : सध्या सर्वत्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर, लग्नसमारंभ, सण-उत्सवांवर निर्बंध असल्याने फुलांची मागणीच कमी झाली आहे. त्यातच मर्यादीत लोकांच्या संख्येत सोहळे आयोजित करण्यात येत आहेत. त्यामुळे फुलाला बाजारात मागणी राहिलेली नाही.
परिणामी बाजारात फुलांची विक्री ठप्प झाली असून कवडीमोल दराने फुलविक्री होत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघेनासा झाला आहे. पावसाळा हा फुलांना बहर येण्याचा हंगाम असतो. या सर्व प्रकारामुळे फुल तोडणीचा खर्चही निघत नसल्यामुळे फुल उत्पादक शेतकरी व फुल विक्रेते आर्थिक संकटात सापडले असून सरकारकडून मदतीची मागणी करण्यात येत आहे.
मंदिरा बाहेर होणारी फुलांच्या हाराची विक्री, विविध सण, समारंभात फुलांच्या गुच्छापासून सजावटीपर्यंत त्याचा होणारा वापर या गोष्टी त्याच्याच निदर्शक आहेत. बाजारातील वाढती मागणी पाहता फुलशेती हा सर्वात चांगला, नफा देणारा व्यवसाय बनला होता. बाजारात गुलाब, जरबेरा, निशिगंध, केवडा, झेंडू आदी फुलांना मागणी अधिक असते. महाराष्ट्र फूल उत्पादनाच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. ग्रामीण भागात फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर खूप उलाढाल होते. एक एकर फुलबागेकरीता साधारण दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो.
शेतकरी झाला कर्जबाजारी
सध्या उत्सव बंदीमुळे फक्त उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. यंदा हंगामभार फुलाला दर मिळाला नही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक लागवडसाठी गुंतवलेले पैसेही निघाले नसल्याने अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. मार्च आणि जून दरम्यान शेतकरी फुल शेतीस सुरुवात करतात. यातील बहुतांश शेतकरी पावसाच्या पाण्यावर म्हणजे जूनमध्ये पिकाची लागवड करतात. आॅगस्टपर्यंत पीक येण्यास सुरुवात होते. मात्र, यंदा भागातील फुल पीक गणेशोत्सव काळात आले नाही. त्यामुळे यावेळी बाहेरील राज्यातील मालाची आवक बाजारात होती. स्थानिक फुले सप्टेंबरच्या सुरुवातीला बाजारात आली.
फुल उत्पादक शेतकरी अडचणीत
यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. अनेक शेतकऱ्यांचे शेतातील फुलपीक सडले. त्यामुळे त्यांनी पीक उपटून टाकले. मात्र काही पीक शेतात आहे. पण उत्सव बंदीने तेही कसे विकावे? असा प्रश्न आहे. झेंडू, गुलाब, गॅलेंडिया फुल पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.
- योगेशराव बबनराव गुंडे (फुल उत्पादक शेतकरी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.