कोरोनाचा फटका! शाळा बंदमुळे बालकामगार वाढण्याची भीती

बालकामगार
बालकामगार
Updated on

नांदेड : गत वर्षापासून कोरोनामुळे (Corona) सर्वच परिस्थितीवर परिणाम झाला असून, सर्वाधिक नुकसान शिक्षण क्षेत्राचे होत आहे. सलग दुसऱ्या वर्षीही शैक्षणिक सत्र ऑनलाइन शिक्षणाशी जोडल्या गेल्याने, विद्यार्थ्यांना शैक्षणिक फायदा कमी अन् नुकानच अधिक होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे बालहक्क संरक्षण कायद्याचे (Child Rights) लक्तरे टांगली जात असून, आणखी काही दिवस विद्यार्थी शाळेपासून दूर राहिल्यास भविष्यात मोठ्या प्रमाणात बालकामगार वाढण्याची भीती शिक्षण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. कोरोना काळात शासनाने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ऑनलाइन शिक्षण (Online Education) प्रणाली सुरु केली. त्यासाठी परिस्थिती नसताना गोरगरीब पालकांनी आपल्या पाल्यांसाठी स्मार्टफोनची व्यवस्था केली. परंतु, शहरी (Nanded) भाग वगळता ग्रामीण भागात शासनाची ऑनलाइन ज्ञानगंगा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास अपयशी ठरली. शिक्षणासाठी घेण्यात आलेल्या मोबाईलचा मुलांकडून दुरुपयोग अधिक प्रमाणात होताना दिसत आहे. विशेष म्हणजे कोविडमुळे मोलमजुरी करणाऱ्या लोकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्यामुळे व मजुरी करून पोट भरणाऱ्या लोकांची आर्थिक परिस्थिती अधिकच खालावली आहे.

बालकामगार
शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचे काम 'काँग्रेस'ने केले

आर्थिक दृष्ट्या अत्यंत दुर्बल असणारे पालक मोबाईल घेऊ शकत नसल्याने त्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहत मोलमजुरी करावी लागत आहे, अशी अनेक बालके मजुरीच्या शोधात वणवण भटकतानादिसत असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे. त्यामुळे शासनाने बाल हक्क संरक्षण कायदा अंतर्गत बालकामगार विरोधात मोहीम राबवली, तरी सुद्धा हतबल परिस्थितीमुळे भविष्यात बालकामगार मोठ्या प्रमाणावर उदयास येणार असल्याचे भाकीत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

शिक्षण की उदरभरण?

कोरोनामुळे असंघटित क्षेत्रातील लोकांचे जगण्याचे प्रश्न निर्माण झाले आहे. गरिबांसमोर रोजीरोटीचा व उदरनिर्वाहाचा सवाल उभा आहे. याचा सर्वाधिक परिणाम बालकांना भोगावा लागणार आहे. जगण्यासाठी संघर्ष करताना कोरोनानंतर मुले शाळेत कमी अन काम करताना अधिक दिसत आहेत. पोटाची भूक भागविण्यासाठी मुलांच्या खांद्यावर जबाबदारी मोठ्या प्रमाणात आली आहे. यावेळी शिक्षण की, उदरभरण?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बालकामगार
रागाच्या भरात गेलेल्या मुलाला पोलिसांनी अवघ्या दोन तासात शोधले

ऑफलाइन शिक्षण सुरु करावे

शासनाने या संभाव्य संकटाची तीव्रता लक्षात घेता कठोर उपाययोजना करावी. विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षणाची व्यवस्था करून द्यावी व त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावे.

- संदीप सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.