नांदेड : संचारबंदी व लॉकडाउनच्या (Lockdown) १५ दिवसानंतर जिल्ह्यातील कोरोनाच्या ( Nanded corona virus) तीमध्ये हळुहळु सुधारणा होत आहे. गुरुवारी (ता. सहा) प्राप्त झालेल्या तीन हजार ३७८ स्वॅबपैकी दोन हजार ६७४ निगेटिव्ह, ६६१ अहवाल पॉझिटिव्ह (Possitive) आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णाचा जोर ओसरण्याचे प्रमाण ८९.५६ टक्के इतके झाले आहे. Corona in Nanded district loses momentum; One thousand 273 patients were released on Thursday
गुरुवारी एक हजार २७३ कोरोना बाधित रुग्णांनी आजारावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत हजार ७४ हजार ८३८ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. गुरुवारी विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गंभीर रुग्णांपैकी पाच पुरुषांचा, श्रीगुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालयातील तीन महिला, चार पुरुषांचा, देगलूर कोविड सेंटरमधील एक महिला, श्रीगणेश, भगवती, फोनिक्स व व्हिजन या चार खासगी कोविड सेंटरमधील प्रत्येकी एक पुरुषाचा अशा १७ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्हाभरातील एक हजार ६६८ बाधितांचा मृत्यू झाला आहे.
गुरुवारी नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात- १९९, नांदेड ग्रामीण- १५, बिलोली- १५, हिमायतनगर- १२, उमरी- पाच, माहूर- पाच, कंधार- ३२, देगलूर- ७२, मुदखेड- १२, मुखेड- ३८, अर्धापूर- १७, धर्माबाद- ३६, किनवट- ६१, नायगाव- २८, भोकर- चार, लोहा- ३१, हदगाव- ४४, हिंगोली- २१, परभणी- तीन, यवतमाळ- पाच, लातूर- दोन, बिदर- तीन व चंद्रपूर एक असे ६६१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ८३ हजार ५५९ इतकी झाली असून, त्यापैकी ७४ हजार ८३८ रुग्ण कोरोनामुक्त तर एक हजार ६६८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या सहा हजार ७७२ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. त्यापैकी १९८ बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.
नांदेड कोरोना मीटर ः
एकूण पॉझिटिव्ह ः ८३ हजार ५५९
एकूण कोरोनामुक्त ः ७४ हजार ८३८
एकूण मृत्यू ः एक हजार ६६८
गुरुवारी पॉझिटिव्ह ः ६६१
गुरुवारी कोरोनामुक्त ः एक हजार २७३
गुरुवारी मृत्यू ः १७
उपचार सुरु ः सहा हजार ७७२
गंभीर रुग्ण ः १९८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.