नांदेडमध्ये शनिवारी कोरोना रुग्णसंख्येत वाढ

८२ अहवाल पॉझिटिव्ह; २७२ रुग्णांवर उपचार सुरु
covid
covidsakal
Updated on

नांदेड : जिल्ह्यातील कोरोनाबाधित(nanded corona update) रुग्ण संख्या वाढत असली तरी, बाधित रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अनेक दिवसांपासून शुन्यावरच आहे. शनिवारी (ता. आठ) प्राप्त झालेल्या ९९५ अहवालापैकी ८२ व्यक्तींचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. दिवसभरात नऊ रुग्ण बरे झाल्याने त्यास सुट्टी देण्यात आली. सध्या २०४ रुग्ण उपचार (treatment)घेत असून त्यापैकी चार बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.

covid
नांदेड : विद्यार्थ्यांना मिळाली अत्याधुनिक शस्त्रांची माहिती

जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या ९० हजार ८३४ एवढी झाली असून यातील ८७ हजार ९०७ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६५५ एवढ्यावर स्थिर आहे. शनिवारी नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात ४६, नांदेड ग्रामीण १३, मुदखेड -एक, नायगाव -दोन, बिलोली -एक, किनवट -एक, कंधार -एक, हिंगोली -एक, परभणी -चार, लोहा -तीन, देगलूर- तीन, अर्धापूर- दोन, पंजाब -दोन, धर्माबाद -एक, मुखेड -एक असे मिळून ८२ जणांचे अहवाल बाधित आले आहेत.

covid
नांदेड : शासकीय रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीचे सुशोभीकरण

सध्या विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात १८, नांदेड महापालिकातंर्गत गृह विलगीकरणातील २०३, नांदेड वाघाळा महापालिकेच्या श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक रुग्णालयात दोन, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरणातील ४० तर खासगी रुग्णालयातील नऊ असे एकूण २७२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे.

नांदेड कोरोना मीटर

  • एकूण बाधित - ९० हजार ८३४ एकूण बरे - ८७ हजार ९०७

  • एकूण मृत्यू - दोन हजार ६५५ शनिवारी बाधित - ८२

  • शनिवारी बरे - नऊ शनिवारी मृत्यू - शून्य

  • उपचार सुरु - २०४ गंभीर रुग्ण - चार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.