कोरोनाने वाढविले या तालुक्यात ‘टेन्शन’

nnd13sgp11.jpg
nnd13sgp11.jpg
Updated on


धर्माबाद, (जि. नांदेड) : नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील नागरिक मात्र प्रशासनाच्या नियमांचे पालन न करता बेफिकीरीने वावरत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोना संसर्गाची साखळी मोडण्यासाठी रविवारी (ता.१२) मध्यरात्रीपासून पुढील आठ दिवस लॉकडाउनचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे धर्माबाद शहरामध्ये फक्त अत्यावश्यक सेवामध्ये मेडिकल आणि कृषी सेवा केंद्र वगळता शहरात पूर्णपणे लॉकडाउनची अंमलबजावणी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे रस्ते निर्मनुष्य व शुकशुकाट होते.


आकड्यातही भर पडल्याने चिंताही वाढली
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आला होता. या लॉकडाउनची नांदेड जिल्ह्यासह धर्माबादेतही काटेकोरपणे अंमलबजावणी झाली. त्यानंतर लॉकडाउनमध्ये सूट देण्यात आली. त्यात नागरिकांनी गर्दी करू नये, सोशल डिस्टन्स ठेवणे, मास्कचा वापर करणे, निर्जंतुकीकरण करणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदी नियम व अटी घालून दिल्या होत्या. सुरवातीचे काही दिवस नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन केले. परंतु त्यानंतर बेफिकीरी वाढतच गेली. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला. मृत्यू पावणाऱ्यांच्या आकड्यातही भर पडल्याने चिंताही वाढली. 

कोणीही घराबाहेर पडू नये
अशा परिस्थितीत कोरोनाबाबत नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन न करता बेफिकीरीने वावरत होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोना संसर्गाची साखळी मोडण्यासाठी रविवारी मध्यरात्रीपासून पुढील आठ दिवस लॉकडाउनचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे धर्माबाद शहरामध्ये फक्त अत्यावश्यक सेवामध्ये मेडिकल आणि कृषी सेवा केंद्र वगळता शहरात पूर्णपणे लॉकडाउनची अंमलबजावणी येथील उपविभागीय अधिकारी डॉ. राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्याचे दिसून आले. सोमवारी सकाळपासूनच शहरातील नागरिक घराबाहेर पडलेच नाही. शहरातील गजबजलेले रस्ते सकाळपासून ओस पडली होती. मुख्य मार्केट, बाजारपेठेतही सन्नाटा दिसून आला. पोलिस प्रशासनाच्या वतीने सकाळीच सायरन वाजत वाहने फिरवून नागरिकांना सावध करीत कोणीही घराबाहेर पडू नये, प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल,  अशा सुचना करीत होते. 


२५ जणांचे स्वॅब पाठविले तपासणीसाठी
नांदेड जिल्ह्यात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने अखेर धर्माबादेतही शिरकाव केला. तालुक्यातील माष्टी येथील कोरोनाचा एक रुग्ण व धर्माबाद पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक व त्यांच्या परीवारातील दोघे असे चार जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे आढळून आल्याने धर्माबादकरांनी धास्ती घेतली. व प्रशासनही खडबडून जागे झाले. या चार कोरोनाबधित रुग्णाच्या संपर्कात असलेल्या २५ जणांचे स्वॅबचे नमुने सोमवारी सकाळी घेण्यात आले, व त्यांना माहेश्वरी भवनमधील कोविड सेंटरमध्ये कोरंटाईन करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांनी दिली. त्यापैकी काही जणांचा रिपोर्ट संध्याकाळी तर काहींचा रिपोर्ट मंगळवारी सकाळी येणार आहे. त्यांचा अहवाल काय येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले आणखी २५ जणांचे स्वॅबचे नमुने मंगळवारी सकाळी घेण्यात येणार असल्याचे तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले.

संपादन - स्वप्निल गायकवाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.