नांदेड : जागतिक महामारीत कोरोनाने सर्व जगातील लोकजीवन सर्वच पातळीवर हलवून टाकले. कोरोनाच्या विरुध्द सर्वच यंत्रणेने आपले योगदान देत कोरोना योध्याची भूमिका बजावलीय आणि बजावत आहेत. मराठवाडाच्या स्वातंत्र्य संग्रामात स्वामी रामनंद तीर्थ यांचे योगदान अमूल्य आहे. स्वातंत्र्य, शिक्षण,आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा लढ्यात जसे त्यांचं योगदान आहे तसेच देखील आत्ता ज्यांच्या नावाने हे विद्यापीठ स्थापन झाले आहे. त्याचा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याचा वसा म्हणून आजच्या कोरोना संसर्गजन्य अश्या लढाईत कोरोना योध्दा विद्यापीठ म्हणून भूमिका बजावली आहे.
एकसंघ टीमवर्कने शिक्षणसंस्था, राजकीय इच्छाशक्ती व पाठबळ, काय रचनात्मक कार्य करु शकते याच हे उदाहरण आहे. विद्यापीठ प्रशासनाला सोबत घेवून चालणारे कुलगुरु डॉ. उध्दव भोसले यांचे नेतृत्व, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे प्रशासकीय पातळीवरचे सहकार्य व प्रयत्न, पोलिस यंत्रणेचे कार्य हे सर्वाचे काम कौतुकास पात्र आहे. संशोधक प्राध्यापक आणि विद्यार्थी यांची काम करण्याची आंतरिक तळमळ या सर्व गोष्टीच्या सहकार्याने आणि महत्वाचे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळे कोरोना तपासणी प्रयोगशाळा उभारणी आणि त्याचे काम यशस्वी झाले आहे. अवघ्या 23 दिवसाच्या आत सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करुन ही लॅब तपासणीसाठी सिध्द केली. विद्यापीठाने शिक्षणा प्रमाणेच आरोग्य यंत्रणेला सहकार्य करित कोविड निदान चाचणीचे केंद्र स्थापन करुन आपल्या खऱ्या सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका पार पाडली.
मराठवाड्यात पूर्वी कोरोना चाचण्या औरंगाबाद किंवा पुणे या ठिकाणी केल्या जात होत्या. यामुळे बऱ्याच अडचणीना रुग्ण आणि यंत्रणा यांना सामोरे जावे लागत होते. या लॅबमुळे सर्व यंत्रणांच्या एकत्रित प्रयत्नाला यश येवून नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात उपलब्ध पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाच्या आधारे कोविड तपासणीनी लॅबनी लवकर निदान आणि उपचार करण्यात महत्वाची भूमिका बजावली.
नांदेड हा भौगोलिकदृष्ट्या मोठ्या असणाऱ्या जिल्ह्याला तीन राज्याच्या सीमा असल्याने इतर राज्यातील नागरिक या ठिकाणी रोजगार व अन्य कारणाने जोडले आहेत. यामुळे पर्यायाने कोरोना संसर्ग वाढ होत गेली. त्याचप्रमाणे नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्हयांतील कोरोना रुग्णांच्या स्वॅबची किंवा नमुन्यांची तपासणी या ठिकाणी केली जात आहे. लॅबचे प्रमुख डॉ. गजानन झोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना तपासणी काम केले जात आहे.
स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठी लढाईनंतर आता राज्य किंवा देशा समोर जीवन अबाधित ठेवण हे मोठे आव्हान बनले आहे. कोरोनामुळे जीवनावर सर्वच बाबतीत बदल घडले. या आजाराने डॉक्टर्स, शास्त्रज्ञ, आरोग्य कर्मचारी यांच्या अहोरात्र प्रयत्न करीत ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट मध्ये पुढाकार घेऊन कोरोना मुळे होण्याऱ्या जीवितहानी टाळण्यासाठी मदत झाली. विद्यापीठ कोरोना तपासणी लॅबसाठी, परभणी, नांदेड, हिंगोली या तीनही जिल्हाधिकारी कार्यालयाने आवश्यक ती मदत आणि मनुष्यबळ हे विद्यापीठाने उपलब्ध करुन दिले. समाजाच्या कान, नाक, डोळ्याची भूमिका शिक्षण क्षेत्रात प्रथम घेतली जाणे आवश्यक आहे, आणी हीच भूमिका घेवून विद्यापीठ सहभागी सहभागी झाले ते कोरोना तपासणीसाठी. या तपासणीसाठी परवानगी भारतीय आयुर्विज्ञान अनुसंसाधन परिषद, दिल्ली (Indian Council of Medical Research)आयसीएमआर मान्यता असलेली तसेच पहिले NABL,म्हणजे National Accreditation Board for Testing and calibration.असलेले भारतातील NABLचे पहिले मान्यता मिळवणारे पहिले अकृषी विद्यापीठ म्हणून नांदेडचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ठरले. ही मराठवाडयासाठी अभिमानाची बाब आहे. या लॅबची प्रतिदिन कोरोना नमुना तपासणीची 600 अहवाल क्षमता असून आजपर्यंत 80 हजार एवढ्या कोरोना चाचण्याचे अहवाल तपासण्याकेल्या आहेत.
विद्यापीठामध्ये कोविड तपासणी लॅबचे प्रमुख डॉ झोरे यांच्यासह असणाऱ्या जैवशास्त्र विभागातील होतकरू विद्यार्थी आणि संशोधक यांनी दिलेले योगदान तेव्हढेच महत्वाचे आहे. नांदेड विद्यापीठाने कोरोनाप्रमाणोच इतर विषाणू संसर्गाचे निदान करणारी यंत्रणा येथे उपलब्ध केली असून प्रगत तंत्रज्ञान आणि साहित्य सामुग्री उपलब्ध करुन विविध तपासण्या करण्याची तयारी करण्याबाबतचे काम सुरू असल्याचे कुलगुरु डॉ. उध्दव भोसले यांनी सांगितले. सध्या या लॅबमध्ये Semi Automated Testing पद्धतीने तपासणी करण्यात येत असून येणाऱ्या काळात येथे पूर्णपणे Fully Automatic Testing System कार्यान्वित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
तसेच या तपासणी लॅबविषयी राज्यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री तथा नांदेड जिल्ह्यांचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की "अडचणीच्या काळात नांदेड विद्यापीठाने कोरोना तपासणीसाठी विद्यापीठाने सहकार्याची आणि संशोधक भूमिका घेतली याबाबत विद्यापीठाचे कौतुक केले पाहिजे " अश्या शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माणसाचं जीवन अमूल्य आहे, हे अमूल्य जीवन वाचवण्यात पुस्तक किंवा ज्ञान उपयुक्त असते, तसेच ज्ञानदान करण्याबरोबरच जीवनदान देण्याचे किंवा जीवन वाचवण्याचा धडा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने देण्यात महत्वपूर्ण भूमिका व जबाबदारी पार पाडली म्हणूनच या विद्यापीठास "कोरोना योध्दा विद्यापीठ " असं म्हणता येईल.
- मीरा ढास, सहायक संचालक (माहिती) विभागीय माहिती कार्यालय, लातूर यांच्याकडून साभार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.