नांदेड : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण बुधवारी (ता. १७) दुपारी तीन वाजता दुरचित्रवाणी संदेश प्रणालीव्दारे (व्हीसी) जिल्हा प्रशासनास समवेत आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत विविध विषयावर चर्चा होणार आहे. कोरोना संसर्गातून मुक्त झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच बैठक आहे.
बधुवारी दुपारी होणार ‘व्हीसी’
जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता. १७) तीन वाजता जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्यासह अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत प्रामुख्याने नांदेड जिल्ह्यातील कोनोना संक्रमणाची सद्यस्थिती.
हेही वाचा.....राज्य विधानपरिषदेवर मातंग समाजाला न्याय द्या- ॲड. घोडजकर
कोरोना सध्यस्थितीबद्दल घेणार माहिती
कोरोना उपचारासाठी उपलब्ध खाटा, व्हेंटिलेटर यासोबतच कोरोनाविरुद्ध लढाईसाठी पीपीटी किट, औषधी, ऑक्सीजन, सिलेंडर, वैद्यकीय व इतर कर्मचारी आदींची उपलब्धता व पुरवठा बाबत चर्चा होणार आहे. या सोबतच जिल्हा पुरवठा विभागांतर्गत वितरित झालेले धान्य व पुढील काळासाठी उपलब्ध होणाऱ्या मदतीबाबत चर्चा होणार आहे. रेशन दुकानदार व त्यांच्या मदतनीसांचा विमा उतरण्याच्या मागणी बाबत चर्चा होईल. लॉकडाउन शिथिल करण्याबाबत निर्देशांची अंमलबजावणी, जिल्ह्यातील धान्य, भाजीपाला, फळे, दूध, औषधी आदी जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता व पुरवठा, खरीप हंगामाची पूर्वतयारी, बी-बियाणे, खते कीटकनाशके आधीची मागणी व उपलब्धता.
हेही वाचलेच पाहिजे...... नांदेडकरांना सोमवारी साखर झोपेतच धक्का, सहा पॉझिटिव्ह
कर्जमाफी व पिककर्ज वाटपाचा आढावा
जिल्हा बँक, राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँकांना दिलेले कृषी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट व त्याचे प्रत्यक्ष वितरण, महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेसंदर्भात लाभार्थी ठरलेल्या परंतु अद्याप प्रत्यक्ष लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची रक्कम भरण्याची हमी राज्य सरकारने घेतली आहे. अशा शेतकऱ्यांना थकीत कर्जदार संस्थांच्या नवे कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. याच्या अंमलबजावणी संदर्भात चर्चा होणार आहे. शेतीमाल खरेदी, सद्यस्थिती शेतीमाल बाजार भावाची शेती व त्या अनुषंगाने करण्याची कारवाई, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये जिल्ह्याल्या मिळेल्याची निधीची माहिती, मजुरांचे स्थलांतर झाल्याने उद्योग व्यवसायांना परिणाम व त्या अनुषंगाने उपाययोजना.
शैक्षणिक संस्था सुरु करण्याच्या तयारीचा आढावा
शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा निर्णय शासनाने अद्याप झाला नसला तरी पुढील काळात हा निर्णय झाल्यानंतर सोशल डिस्टन्स व इतर वैद्यकीय खबरदारीच्या उपाययोजना यांची अंमलबजावणी करण्यासाठी शैक्षणिक संस्थांच्या तयारीचा आढावा, शैक्षणिक संस्था बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व त्या अनुषंगाने पुढील उपाययोजना, लॉकडाउनमुळे पाठ्यपुस्तकाचा पुरवठा उपलब्धतेवर परिणाम, गोदावरी शुद्धीकरण प्रकल्प यासोबतच नांदेड जिल्ह्यातील पाणी स्थिती, धरणातील जलसाठा, पिण्याच्या पाण्याचे उपस्थिती याशिवाय आणखी काही महत्त्वाचे विषय असेल तर पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून द्यावे अशी आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.