Cotton crop : भाववाढीची प्रतीक्षा; हजारो क्विंटल कापूस घरातच

गतवर्षी परतीच्या पावसाने खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी मेटाकुटीस आलेले आहेत. कपाशीचे पीक शेतकऱ्यांसाठी पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. दरम्यान, याच पांढऱ्या सोन्याला बाजारात कवडीमोल भाव मिळत आहे. मागील आठवड्यात ७ हजार ७०० रुपयांपर्यंत भाव गेले होते.
Cotton crop
Cotton cropsakal
Updated on

कंधार : गतवर्षी परतीच्या पावसाने खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी मेटाकुटीस आलेले आहेत. कपाशीचे पीक शेतकऱ्यांसाठी पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. दरम्यान, याच पांढऱ्या सोन्याला बाजारात कवडीमोल भाव मिळत आहे. मागील आठवड्यात ७ हजार ७०० रुपयांपर्यंत भाव गेले होते. परंतु, झालेला खर्च बघता १० हजारांचा भाव मिळणे अपेक्षित होते. सोयाबीनला भाव कमी लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांची अपेक्षा भंग झाली आहे. यामुळे आर्थिक गणिते कोलमडली आहेत. यावर्षी तर बियाणे, खतांची टंचाई करून जादा भावांनी विक्री होत आहे. याकडे कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लक्ष घालून दिलासा देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

कंधार तालुक्यात कपाशी, सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. मागील दोन ते तीन वर्षांपासून परिसरात पावसाचे प्रमाण कमी-जास्त होत आहे. त्यातच अवकाळीने नुकसान झाले आहे. दसरा-दिवाळी दरम्यान झालेल्या परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला खरिपाचा घास हिरावला गेला. यामध्ये सोयाबीन, तुरीचा दिवाळीनंतर भाव वाढेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, नव्या वर्षातील जून महिना देखील अर्धा उलटला आहे. तरीही कापसाच्या भावात सतत घसरण कायम आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, कुटुंबातील लहान-मोठे आजारपण, मुलांचे शिक्षण, वाढती महागाई, लग्न आदींमुळे शेतकरी आधीच मेटाकुटीस आलेले आहेत. किमान झालेला खर्च तरी निघेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

खर्च ५० हजारांचा, उत्पन्न केवळ २५ हजार

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. मागील तीन वर्षांपासून परिसरात कपाशीचे उत्पादन घटत आहे. परिणामी लागवड खर्च मात्र वाढत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. यामुळे मदतीची मागणी होत आहे. एकरी पन्नास हजार रुपयांचा खर्च करून उत्पन्न मात्र वीस ते पंचवीस हजार रुपये होत आहे. त्यातही शेतात काम करण्यासाठी कामगार मिळत नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.