नांदेडची वाटचाल बिहारकडे सुरु; गोळीबारने हादरतेय शहर

याच गोळीबार प्रकरणात पोलिसांनी दोघांचे एन्काउंटर केले. तर आरोपींनी केलेल्या गोळीबारात काही जणांचा मृत्यू झाला
crime news
crime newscrime news
Updated on

नांदेड: शहरात गोळीबारांची मालिका सुरुच आहे. एखाद्या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर गवगवा करणाऱ्या पोलिस प्रशासनाला मात्र पिस्तुल कुठे विक्री होतात याचा तपास घेण्यात अपयश येत आहे. गोळीबारात अनेकजण मारले गेले असून अनेकांवर जखमी होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नांदेडची वाटचाल बिहारच्या दिशेने सुरु असल्याचे दिसून येत आहे. नांदेड जिल्ह्यात पिस्तूलचा वापर खेळणीसारखा होत आहे. दिसेल त्या दिशेने गोळी झाडून लुटमार करण्याची पद्धत वाढली आहे.

याच गोळीबार प्रकरणात पोलिसांनी दोघांचे एन्काउंटर केले. तर आरोपींनी केलेल्या गोळीबारात काही जणांचा मृत्यू झाला. अनेकजण जखमी झालेत. परंतु कायमस्वरुपी बिमोड करण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही. गल्लोगल्ली, रस्त्या-रस्त्यावर नागरिकांना लुटले जात आहे. सातत्याने होत असलेल्या या गोळीबार प्रकरणाने व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिक भयभीत झाला आहे. त्यातच नांदेडच्या पोलिस दलात राजकारण्यांचा शिरकाव असल्याने चंद्रकिशोर मीना, लक्ष्मीकांत पाटील, रवींद्र सिंघल, शहाजी उमाप यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी नांदेडात टिकत नाही, हे दुर्दैव आहे. एरव्ही त्यांना राजकारणी टिकू देत नाहीत, हे वास्तव आहे.

crime news
Parbhani Rain: मानवत तालुक्यात पाच हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली

नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत कितीवेळा गोळीबार झाला. कितीजणांचा बळी गेला. किती आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. आणि किती आरोपींना अटक करून किती पिस्तुल पोलिसांनी जप्त केले. याची माहितीसुद्धा देण्याचे धाडस पोलिस दलात नसल्याचे दिसून येत आहे. नामुष्की टाळण्यासाठी माहिती दिली जात नसल्याची चर्चा ऐकावयाला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.