अवैध मुरुम उत्खननप्रकरणी कारवाईसाठी गेलेल्या पथकावरच हल्ला

अवैध मुरुम उत्खननप्रकरणी नायगावला गुन्हा नोंद
Crime registered in Naigaon illegal sand excavation sand mafia nanded
Crime registered in Naigaon illegal sand excavation sand mafia nandedsakal
Updated on

नायगाव : अवैध मुरुम उत्खननप्रकरणी कारवाई करण्यासाठी गेलेल्या नायगाव तहसीलच्या महसूल पथकासोबत हुज्जत घालत शिविगाळ केली आणि हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गडगा येथे पहाटे २ वाजता घडली. या प्रकरणी मंडळ अधिकारी फुफाटे यांच्या तक्रारीवरून दोन मुरुम माफीयांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यासह विविध कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नायगाव तालुक्यात अवैध गौण खनिजाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे तहसीलदार गजानन शिंदे यांनी मंडळ अधिकारी हरिभाऊ फुफाटे यांच्या नेतृत्वाखाली एका भरारी पथकाची नेमणूक केली. या पथकाला गडगा कौठा शिवारात अवैध मुरुमाचे उत्खनन चालू असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे फुफाटे यांनी रात्री दोन वाजता शासकीय वाहण क्रमांक (एम.एच २६, बी. सी.५७५२) मधून तलाठी संतराम शहाणे, शाम मुंढे व विलास गुंजकर यांना सोबत घेवून (ता.आठ) रोजी पहाटे २ वाजता गडगा कौठा रोडवर गेले असता रोडच्या उजव्या बाजुस हळदीचे पिकाचे शेताजवळ शेतात मुरुम उत्खनन होत असल्याची दिसून आल्याने रोडवरुन आत कच्चा रस्त्याने शेतामध्ये जावुन जिपच्या उजेडात पाहीले असता समोरुन एक मुरमाने भरलेला ट्रॅक्टर येत असताना दिसले.

पथक आल्याचे दिसताच ट्रॅक्टरचे चालकाने ट्रॅक्टर मधील मुरुम रोडवर खाली केला. पण त्याला हात दाखवून थांबवण्याचा ईशारा केला असता ट्रॅक्टर न थांबवता शासकीय वाहणाला धक्का मारुन निघून गेला. यामुळे शासकीय वाहनाचे नुकसान झाले. या वेळी (एम.एच.२६ बी. क्यू. ९२६१) या जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन करतांना आढळले. ही जेसीबी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता (एम.एच. २६ ए.के. ५५) ही स्कार्पीओ गाडी आली. यातून दोन व्यक्ती आले व जेसीबी ताब्यात घेत आडवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर अश्लील शिविगाळ केली, महसूलच्या पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मंडळ अधिकारी फुफाटे यांनी नायगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रीवरुन बालाजी देविदास पवळे, गजानन देविदास पवळे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी फरार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.