शेतात पाणी साचल्याने पिकांना फटका

ओल्या दुष्काळास एक ऑक्टोबरची सरासरी महत्त्वाची : कापूस, सोयाबीन पेरणीचे दिवस संपले
Crops hit due to water logging in fields
Crops hit due to water logging in fields
Updated on

नांदेड - गेल्या आठवड्याभरापासून मान्सूनची संततधार सुरु होती. त्यामुळे शेतशिवारात पाणीच पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा झाला नसल्याने पिके संकटात सापडली आहेत. जुलै महिन्यात ३६ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत. आठ दिवसानंतर शुक्रवारी (ता.१५) पाऊस थांबला असून सूर्यनारायणाचे दर्शन होत आहे.

जिल्ह्यात अनेक भागात कधी मुसळधार तर कधी संततधार पाऊस होता. दीड महिन्यातच जिल्ह्यात ५८९.८० मिलीमीटर पाऊस झाला आहे. यंदा अतिवृष्टीने रेकाॅर्ड मोडला आहे. अनेक मंडळात चारवेळा अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आठ तालुक्यांसह ३६ मंडळात अतिवृष्टी नोंदली गेली आहे. या भागातील शेतात पाणी साचल्याने पीक पाण्याखाली गेले आहे. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सुरु झाली आहे. मात्र, नियमानुसार ओल्या दुष्काळासाठी एक आॅक्टोबरची पावसाची सरासरी महत्त्वाची मानली जाते.

अतिवृष्टीमुळे पूर तसेच शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. या संकटप्रसंगी प्रशासनाने तांत्रिक बाबी दूर करून ताबडतोब एकरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी.

- सुभाष कोल्हे हसरदकर, जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड.

आठ दिवसांपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतजमीन खरडून गेली. पिकांचे नुकसान झाले. आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. मात्र, पेरणीची सोय राहिलेली नाही. शासनाने शेतकऱ्यांसाठी निर्णय घ्यावा.

- रोहिदास काकडे पाटील, शेतकरी.

खरीप हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांनी कशीबशी आर्थिक तजवीज केली. अतिवृष्टीने शेतकरी संकटात आहे. आधिच आर्थिक घडी विस्कटलेली असताना, नवे संकट आले. अशास्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उपे राहणे गरजेचे आहे.

- श्यामराव भुमे, शेतकरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.