पर डे दीड जीबी अन सारा गाव बिझी; इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे आता मोबाईल व्यसनमुक्ती केंद्रे उभारावी लागणार का ?

file photo
file photo
Updated on

फुलवळ ( जिल्हा नांदेड) : वास्तविकता पाहता गेल्या काही वर्षात सर्वच प्रकारच्या व्यसनात विशेष करुन तरुणात कमालीची वाढ झाली असल्याचे निदर्शनास येत असतानाच अशा गंभीर बाबीबद्दल पालक जागरुक नसल्याचे आपण सहज बोलून जातो. अर्थातच पालकांकडे यासंदर्भात वेळच नसल्याचे किंवा त्यांच्या अशिक्षितपणामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत असेही आपणच म्हणतो परंतु सध्याची परिस्थिती पहिली तर त्याहूनही गंभीर आहे. कारण आजघडीला लहान- लहान मुलातही इंटरनेट वापराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे इतर व्यसनाबरोबरच या बदलत्या व्यसनासंदर्भातही पालकांत जनजागृती करण्याची आवश्यकता निर्माण झाली की काय ? असा सवाल उपस्थित होत असून शासनाने भावी पिढी सदृढ, व्यसनमुक्त, अभ्यासू निर्माण करायची असेल तर काही तरी ठोस पावले उचलायला हवी अन्यथा पर डे दीड जीबी अन सारा गाव बिझी असेच म्हणण्याची वेळ आली आहे.

व्यसनांचे तसे अनेक प्रकार आहेत, जे की आपण दैनंदिन जीवनातील व्यवहारात पाहतोय, अनुभवतोय. अशा अनेक प्रकारच्या व्यसनाधीन होऊन त्याला बळी पडून बहुतांश जणांना स्वतःचा जीवही गमवावा लागला असल्याचे अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत. एवढी धोकादायक व्यसन अनुभवतानाच सध्याच्या काळात आणखी एक नवीन व्यसन मुलांना जडलंय ते म्हणजे इंटरनेटचा अति वापर, आणि हे व्यसन म्हणजे अन्य व्यसनापेक्षा अतिशय धोकादायक ठरु लागले आहे.

या व्यसनाने घराघरातला, माणसामाणसातला संवाद दिवसेंदिवस हरवत चालला असून माणस हळूहळू एकलकोंडा बनत जाऊन नकारात्मक विचार सरणी चा शिकार बनून स्वतःचाच कर्दनकाळ ठरु लागला आहे. लहान- लहान मुलांत एकाकीपणा कमालीचा वाढत असून मुलं हट्टी बनत आहेत. एवढेच नाही तर मानसिक स्वास्थ्याबरोबरच डोळ्यावरही त्याचे दुष्परिणाम होताना दिसून येत आहेत. 

त्यामुळे अल्पवयातच मुले एक ना अनेक प्रकारच्या व्यसनांच्या आहारी जात असून त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचा सामना रोजच मुलाबरोबरच पालकांनाही करावा लागत आहे. यासाठी जिल्हा, तालुका स्तराबरोरबरच गाव पातळीवर सुद्धा शासनाने शाळांच्या, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मार्गदर्शन व समुपदेशन केंद्रे चालवण्याची आवश्यकता असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यातून मुलांसह पालकांना समुपदेशन करायला हवे. 

कारण अलीकडच्या काही वर्षात मोबाईल, इंटरनेटचा विस्तार इतका प्रचंड झाला आणि त्याचा वापर ही तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर होऊ लागला त्याकडे कुणाचेही या गंभीर बाबीकडे लक्ष जात नाही. माझा मुलगा, मुलगी छान मोबाईल हाताळतात त्याला मोबाईल मधलं सगळं काही जमत असे कौतुक पालकातूनच केले जाते. मात्र मुलं जस जशी त्या मोबाईल इंटरनेटमध्ये गुरफटत जातात तेंव्हा पालकांना भीती वाटायला लागते. अन आता मुलं हाताबाहेर जाऊ लागल्याने पालकांना काय करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. आईने मोबाईल हिसकावून घेतला किंवा वडिलांनी मोबाईल विकत घेऊन दिला नाही अशा अनेक कारणांनी मुलं सैरावैरा होऊन नको ते पाऊल उचलत असून कैक ठिकाणी याच कारणामुळे मुलाने घर सोडले तर कुठे मुलाने आत्महत्या केली अशा बातम्या आपण पाहतो, वाचतो यावरुन मोबाईल इंटरनेटच वेड कुठल्या स्तराला जाऊन पोहचल आहे याचा अंदाज येतो. 

त्यामुळे जर भावी पिढी, देशाचे आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे आपण त्या उद्याचे भविष्य असणारी मुलं आणि त्यांच्या जडणघडणीत महत्त्वाचा दुवा असलेल्या पालक वर्गाला या महा संकटातून वाचवायचे असेल तर शासनानेच काही तरी पावले उचलावी लागतील आणि ठिकठिकाणी व्यसनमुक्ती आणि समुपदेशन केंद्रे उभारावी लागतील.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.