देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुक जिंकूच, भाजपचा निर्धार

बिलोली (जि.नांदेड) : भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना भास्करराव पाटील खतगावकर. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, बबनराव लोणीकर, सुनिल कर्जतकर, भाऊराव देशमुख, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, आमदार राम पाटील रातोळीकर, राजेश पवार आदी उपस्थित होते.

Updated on

बिलोली (जि.नांदेड) : गेल्या चाळीस वर्षांत राजकारणात सक्रिय राहून गोरगरिबांच्या बळावर वेगवेगळी पदे भूषवताना तळागळातील माणसाच्या (Nanded) विकासाकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. त्यामुळेच अख्या महाराष्ट्राला (Maharashtra) अचंबून सोडणारा गेल्या लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election) निकाल प्रतापरावांच्या रूपाने पाहावयास मिळाला, हे कोणीही विसरू नये. आता होऊ घातलेल्या देगलूर - बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत (Deglur-Biloli By Election) एकजूटीने नियोजनबद्धरित्या निवडणुकीला सामोरे गेलो तर ही निवडणूक नक्कीच जिंकू, यात शंका घेण्याचे कारण नाही, असा विश्वास भाजपचे (BJP) नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर (Bhaskarrao Patil Khatgaonkar) यांनी व्यक्त केला. बिलोली येथील भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात रविवारी (ता.आठ) श्री. खतगावकर बोलत होते. राजकारणात जरूर मतभेद असावेत पण वैर नको, या माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpei) यांच्या भाषणातील ओळीची त्यांनी आठवण करून दिली. तसेच उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकारी यांना निवडणूकीच्या कामाला लागण्याचे आवाहन केले.

बिलोली (जि.नांदेड) : भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना भास्करराव पाटील खतगावकर. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, बबनराव लोणीकर, सुनिल कर्जतकर, भाऊराव देशमुख, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, आमदार राम पाटील रातोळीकर, राजेश पवार आदी उपस्थित होते.
पोलिस अधिकाऱ्याची दादागिरी! रिक्षाचालकाला शिवीगाळ करित मारले

यावेळी प्रामुख्याने या पोटनिवडणुकीचे प्रभारी तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, प्रदेश उपाध्यक्ष सुनिल कर्जतकर, संघटनमंत्री भाऊराव देशमुख, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, आमदार राम पाटील रातोळीकर, राजेश पवार, माजी आमदार गंगाराम ठक्करवाड, ओमप्रकाश पोकर्णा, डॉ. अजित गोपछडे, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, प्रविण पाटील चिखलीकर, आनंद पाटील बिराजदार, श्रावण पाटील भिलवंडे, रवी पाटील खतगावकर, शिवराज पाटील होटाळकर, डॉ. माधव पाटील उच्चेकर, यादवराव तुडमे, विठ्ठल कुडमुलवार आदी उपस्थित होते. विधानसभा प्रभारी श्री.लोणीकर म्हणाले की, ही निवडणूक महाराष्ट्रासाठी किंबहुना भाजपासाठी दिशा देणारी निवडणूक असून यावर येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे.

बिलोली (जि.नांदेड) : भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना भास्करराव पाटील खतगावकर. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, बबनराव लोणीकर, सुनिल कर्जतकर, भाऊराव देशमुख, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, आमदार राम पाटील रातोळीकर, राजेश पवार आदी उपस्थित होते.
समोरील दृश्याने कुटुंबियांनी फोडला हंबरडा, आवाजाने शेजारी धावले

पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे. या निवडणुकीत एक अनुभवी जाणकार नेते भास्करराव पाटील खतगावकर हे नक्कीच चमत्कार घडवून पक्षाला विजय मिळवून देतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खासदार चिखलीकर यांनी पालकमंत्र्यांवर आपल्या भाषणातून तोफ डागली. ते म्हणाले की, ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पालकमंत्र्यांनी या मतदारसंघातील त्यांनी केलेल्या व न केलेल्याही कामाचे भूमीपूजन करून मतदारांना फसविण्याचा प्रयत्न केला असून अशा थापा मारणाऱ्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या एकदिलाने या निवडणूकीत काम करून पक्षाने दिलेल्या उमेदवाराला मोठ्या मतधिक्याने निवडून आणण्याचे त्यांनी आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.