‘डेल्टा प्लस’चे दोन्हींही रुग्ण ठणठणीत, घाबरु नका

delta plus varient
delta plus varientdelta plus varient
Updated on

नांदेड : नांदेडला (Nanded) जून महिन्यात डेल्टा प्लसची (Delta Plus Variant) जिल्ह्यात दोन रुग्ण आढळून आले होते. परंतु या दोन्ही रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. मात्र, असे असले तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये तर काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. कोरोना (Corona) झाला की म्युकरमायकोसीस आणि त्यानंतर डेल्टा प्लस अशी कधी न ऐकलेल्या आजाराचे रुग्ण सापडले की भीती वाटत आहे. परंतु जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा भक्कम असल्याने गंभीरातील गंभीर आजारावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. डेल्टा प्लसच्या दोन्ही रुग्णांच्या संपर्कातील त्यांचे आईवडील यांची देखील आरोग्य तपासणी करण्यात आली असून, त्यांची तब्येत उत्तम असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर (IAS Vipin Itankar) आणि महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन यांनी माहिती दिली.

delta plus varient
सख्ख्या वृद्ध बहिणींचा जावयाकडून खून,मृतदेह पोत्यात बांधून पुरले

त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कुठलेही कारण नाही. परंतु वेळोवेळी आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सुचनांचे सर्वांनी पालन करणे बंधनकारक असल्याचे डॉ. बिसेन यांनी म्हटले आहे. औरंगाबाद, बीड यासह राज्यात काही ठिकाणी डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत. नांदेडसह राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातुन घेतलेल्या स्वबपैकी काही नमुने हे पुण्याच्या प्रयोग शाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. जुलै महिन्यातही नांदेडमधून शंभर स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यात लोहा तालुक्यातील ३८ वर्षीय आणि हडको भागातील १८ वर्षीय तरुणाला डेल्टा प्लसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. परंतु योग्य उपचारानंतर हे दोघेही रुग्ण या आजारातुन बरे झाले आहेत. त्यामुळे काळजी करू नये, असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()