ग्रामस्थ येईना मदतीला! मग उपजिल्हाधिकारीच उतरले पुरात

नांदेड : जिल्ह्यातील जामदरी (ता.भोकर) येथील काळढोह नदीच्या पुरात अडकलेल्या दोघा तरुणांना उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांनी जीव धोक्यात घालून वाचवले आहे.
नांदेड : जिल्ह्यातील जामदरी (ता.भोकर) येथील काळढोह नदीच्या पुरात अडकलेल्या दोघा तरुणांना उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांनी जीव धोक्यात घालून वाचवले आहे.सकाळ
Updated on

नांदेड : जिल्ह्यातील (Nanded) जामदरी (ता.भोकर) (Bhokar) येथील काळढोह नदीच्या पुरात अडकलेल्या दोघा तरुणांना उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांनी जीव धोक्यात घालून वाचवले आहे. जामदरी येथील धम्मपाल संजय कसबे व अर्जुन साईनाथ तमलवाड हे दोन तरुण शुक्रवारी (ता.२३) सकाळी जनावरे चरण्यासाठी नेले होते. घरी दुपारी परतत असताना काळढोह नदीला पूर (Kaldhoh Flood) आला. नदीच्या मध्यभाग अडकलेल्या त्या दोघांनी टेकडीचा आधार घेतला. याबाबत धम्मपाल या तरुणाने घटनेची माहिती वडिलांना फोन करुन दिली. पूर भीषण असल्याने कोणीही मदतीसाठी धावले नाही.(deputy collector jumps in water to save 2 youths in nanded district glp88)

नांदेड : जिल्ह्यातील जामदरी (ता.भोकर) येथील काळढोह नदीच्या पुरात अडकलेल्या दोघा तरुणांना उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांनी जीव धोक्यात घालून वाचवले आहे.
मरणार असलो तरी तुम्ही चांगले जगा! मित्रांना पाठवला शेवटचा निरोप

संबंधित घटनेची माहिती कळताच उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे (Deputy Collector Rajendra Khandare), तहसिलदार भरत सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक विकास पाटील घटनास्थळी आले. मध्यरात्री अंधार असताना श्री. खंदारे हे पाण्यात उतरले. त्यांनी दोरखंडाच्या मदतीने रात्री बारा वाजेच्या सुमारास धम्मपाल व अर्जुन या दोघा तरुणांना सुखरुप बाहेर काढले. यामुळे त्यांचा सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.