Ayodhya Ram Mandir : अयोध्या सोहळ्याचा जिल्हाभरात उत्साह ; २२ जानेवारीला विविध कार्यक्रमांचे आयोजन

अयोध्येतील २२ जानेवारीला होणाऱ्या श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त जिल्हाभर विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक मंदिरांत महापूजा, आरती, महाप्रसादाचे वाटप होणार आहे.
nanded
nandedsakal
Updated on

नांदेड : अयोध्येतील २२ जानेवारीला होणाऱ्या श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त जिल्हाभर विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक मंदिरांत महापूजा, आरती, महाप्रसादाचे वाटप होणार आहे. तर सामाजिक कार्यकर्त्यांकडून मंदिर परिसर स्वच्छ करण्यात येत आहे.

‘कथा प्रभू रामचंद्रजीकी’चे उद्या सादरीकरण

नांदेडः डॉ. अनुराधा पत्की लिखित व दिग्दर्शित रामायणावर आधारित ‘कथा प्रभू रामचंद्रजीकी’ या महानाट्य प्रयोगाचे रविवारी (ता. २१) काबरानगर भागातील भार्गव कोचिंग क्लासेसच्या समोरील मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे संयोजन संस्कार भारती नांदेड समिती आणि लोकोत्सव समितीने केले आहे.

nanded
Ayodhay Ram Mandir : प्राणप्रतिष्ठा राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावी - उद्धव ठाकरे

या नाटकामध्ये विश्वास आंबेकर (राम), भक्ती केळापुरे (सीता), शिवम अन्नमवार (लक्ष्मण), नकुल उपाध्याय (रावण), आनंद तेरकर (कुंभकर्ण), अभय शृंगारपुरे (बिभीषण), श्रीनिवास गुडसूरकर (जांबुवंत), सुरेश उबाळे (सुग्रीव), अंजली माजलगावकर (त्रिजटा), सुफला बारडकर (शबरी), विनायक जकाते (हनुमान) तसेच सुमेध पांडे, अमोल कंडारकर, आदित्य शर्मा, गणेश भोरे, शारदा, युवराज नाईक, वेदांत कोहिरकर आदींनी सहभाग घेतला आहे. सूत्रधाराच्या भूमिकेमध्ये डॉ. प्रणव चौसाळकर हे रामायणातील अनेक संदर्भ आजच्या युगाशी जोडून प्रस्तुतीकरण करणार आहेत. दीप्ती उबाळे आणि संच यांच्या नृत्याविष्कार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन नाटकाच्या दिग्दर्शिका व लेखिका डॉ. अनुराधा पत्की आणि संस्कार भारतीच्या विभाग प्रमुख शर्वरी सकळकळे यांनी केले आहे.

nanded
Ayodhya Ram Mandir : मन राम रंगी रंगले : ज्याने आपल्या आतला रावण काढला तो राम झाला

कंधार येथे २१ हजार लाडूंचा महाप्रसाद

कंधार : श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शहर आणि तालुक्यातील श्रीराम मंदिरांसह विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. लोकोत्सव समितीने यांचे आयोजन केले आहे. २२ जानेवारीला सकाळी दहा वाजता नगरेश्वर मंदिरात २१ हजार लाडूंचा महाप्रसाद करण्यात येणार आहे. या महाप्रसादाचा नैवेद्य दाखवण्यापूर्वी श्रीरामाला अभिषेक आणि आरती करण्यात येणार आहे. सकाळी सहा ते बारापर्यंत श्रीराम मंदिर येथे विधिवत पूजा, अभिषेक, ध्वज पूजन, महाआरती श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात येणार

आहे. दुपारी बारा वाजता महापूजा व महाप्रसादाचा नैवेद्य दाखवण्यात येणार आहे. यानिमित्त उपस्थित भक्तांना अयोध्येतील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहता यावे यासाठी शिवाजी महाराज चौक व श्री राम मंदिर येथे मोठा स्क्रीन लावण्यात येणार आहे. सायंकाळी सहा वाजता उत्तर प्रदेशातील प्रख्यात भजनकार मनोज तिवारी यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. शहरातील सर्व मंदिरांवर रोषणाई करून प्रत्येक मंदिरासमोर आतषबाजी करण्यात येणार आहे. या विविध कार्यक्रमांना सर्व रामभक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन लोकोत्सव समितीने केले आहे.

नरसी येथे मंदिरांची स्वच्छता

नरसी फाटा : अयोध्येतील श्रीप्रभू रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनानिमित्त नरसीतील मंदिर सभोवतालच्या परिसरात भाजपाच्या पुढाऱ्यांकडून स्वच्छतेची मोहीम राबविण्यात आहे.

माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी नरसी (जुने गाव) येथील श्री राम, हनुमानाच्या मंदिराचा गाभारा पाण्याने स्वच्छ धुऊन साफ करून मंदिराच्या सभोवतालचा परिसर देखील साफ करण्यात आला. त्यानंतर प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे पुजारी रामकिशन पांचाळ महाराजासह माणिकराव लोहगावे यांनी यावेळी आरती करण्यात आली. यावेळी गोविंद टोकलवाड, सुभाष पेरकेवार, मारोती मांजरमे, नागोराव बट्टेवाड, प्रभाकर हाळदेकर, हाणमंत भवरे, संभाजी मिसे आदी पदाधिकारी, भाविक उपस्थित होते.

उमरीत संत तुळशीराम कथेला सुरवात

उमरी : अयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त उमरी मोंढा मैदानावर १६ ते २२ जानेवारी दरम्यान संगीतमय तुळशीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. पालखी मिरवणुकीत संजय कुलकर्णी, अमोल पाटील ढगे, गजानन श्रीरामवार, सुभाष पेरेवार, पारसमल दर्डा, अनुराधा कुलकर्णी, शारदाताई यम्मेवार, अशोक मामीडवार, गोविद अट्टल, संतोष शिरुरकर, विक्रम खतगाये, कृष्णा कोहीडवाड, राजेश कुलकर्णी, रुपेश श्रीरामवार, दत्ता जाधव शेकडो भाविकांनी सहभाग घेतला. रामायणाचार्य नरसिंगजी महाराज केरूळकर हे दुपारी २ ते ५ या वेळेत कथा सांगत आहेत. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक गजानन तानाजीराव श्रीरामवार यांच्यासह ग्रामस्थांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.