नांदेड - नांदेड शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी नांदेडला बुधवारी (ता. ३१) शासकीय रुग्णालयांना तसेच कोविड सेंटर व लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासकीय रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना केल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यात विशेष करून नांदेड शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयातही रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे याबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह अधिष्ठाता, आरोग्य विभागाचे विभागप्रमुख प्रमुख वैद्यकीय अधिकारी व इतर अधिकारी यांची मंगळवारी बैठक घेऊन आढावा घेतला होता. त्याचबरोबर विविध रुग्णालयात दोनशे खाटा वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या.
शासकीय रुग्णालयांची केली पाहणी
विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर यांनी बुधवारी नांदेडमध्ये येऊन आढावा घेतला. विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, श्री गुरू गोविंदसिंघजी शासकीय स्मारक जिल्हा कोविड रुग्णालय, महापालिकेचे कोविड चाचणी व लसीकरण केंद्र आदी ठिकाणी पाहणी करून अधिकाऱ्यांबरोबरच नागरिकांशीही चर्चा केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, महापालिकेचे उपायुक्त डॉ. बाबूराव बिक्कड, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन, नांदेडचे तहसीलदार किरण अंबेकर, नायब तहसीलदार मुगाजी काकडे आदी अधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते.
हेही वाचलेच पाहिजे - मुलीच्या बदनामीमुळे आईने मरणाला कवटाळले; भोकर तालुक्यातील प्रकार ः एक आरोपी ताब्यात
जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली बैठक
पाहणीनंतर विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन प्रकृतीबाबत विचारणा केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे जास्तीत जास्त कोरोना चाचणी घेण्यासोबतच ४५ वर्षावरील तसेच ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण वाढविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्याचबरोबर शासकीय कोविड रुग्णालयातील खाटांची संख्याही वाढविण्याच्या सूचना त्यांनी केल्या असून त्यानुसार नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.