नांदेड : गेली दोन वर्षे कोरोना संसर्गामुळे सण, उत्सव उत्साहात साजरे करता आले नाहीत. यंदा मात्र, कोणतेच निर्बंध नसल्याने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खरेदीला बाजारात उधाण आले आहे. वेगवेगळ्या नवीन वस्तू आणि झगमगाटाने बाजारपेठ सजली आहे. त्याचबरोबर दिवाळी म्हणजे फराळ तर आलाच. त्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचीही खरेदी जोमात सुरू आहे. मात्र, असे असले तरी यंदा रेडीमेड फराळाही मागणी वाढली आहे.
दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा...असे सर्वजण म्हणत असतात. कारण दिवाळीत फटाके, रांगोळी, आकाशकंदील आणि सोबतीला फराळ असल्याने बच्चेकंपनीपासून ते ज्येष्ठापर्यंत सर्वांनाच हा सण हवा असतो. त्यात महत्वाचे म्हणजे शेव, लाडू, चिवडा, चिरोटे, करंजी, अनारसे हे पदार्थ तर दिवाळीत हवेच. त्याशिवाय दिवाळी पूर्ण होऊ शकत नाही.
यंदाच्या वर्षी फराळाच्या वस्तूमध्ये किंचित वाढ झाली असली तरी खरेदी मात्र जोमात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्याचबरोबर यंदा रेडीमेड फराळालाही मागणी वाढली आहे. आॅनलाइन तसेच घरपोच फराळ येत आहेत. तसेच महिला बचत गटाच्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातूनही फराळ तयार करण्यात वाढ झाली आहे. मुख्य बाजारपेठेतील स्वीट मार्ट, हलवायाच्या दुकानात फराळ खरेदीची गर्दी वाढली आहे.
मागणी नोंदवून खरेदीत वाढ
महिला बचत गट, सुपर मार्केट आदीमध्ये फराळ उपलब्ध आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मागणी नोंदवून फराळ दिला जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आॅनलाइन फराळाही मागणी वाढली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. शहरी भागात फराळाला मागणी असली तरी अद्याप तालुक्याच्या ठिकाणी तसेच ग्रामिण भागात तेवढी मागणी नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
काही विकत तर काही तयार
दिवाळीच्या फराळाच्या काही वस्तू विकत आणल्या जातात तर काही घरी तयार करण्यात येतात. आम्ही दरवर्षी चिवडा, अनारसे, चकली, करंजी, शंकरपाळे अशा वस्तू घरीच तयार करतो. त्याचबरोबर लाडू, पेढे, शेव, फरसाण अशा वस्तू दुकानातून रेडीमेड मागवत असल्याचे गृहिणी वैशाली शिंदे यांनी सांगितले.
असे आहेत किलोचे दर
चिवडा ः २५० ते ३०० रुपये
शंकरपाळे ः २५० ते २७५ रुपये
शेव ः २०० ते २५० रुपये
चकली ः २५० रुपये
मोतीचूर बुंदी लाडू ः २५० ते ५०० रुपये
बेसन लाडू (तुपातील) ः ४५० रुपये
पौष्टिक लाडू ः ४५० रुपये
बालूशाही ः २५० रुपये
अनारसे ः ३५० ते ४०० रुपये
करंजी ः २५० रुपये
गुलाबजामुन ः २५० ते ३००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.