Nanded Dog Bite Case : तामसा शहरात खळबळ! पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला दहा जणांना चावा; नागरिकांत भितीचे वातावरण

Tamsa latest news in marathi |तामसा शहरातील विविध भागात गुरुवारी (ता. २५) पिसाळलेला कुत्र्याने दहा जणांना चावा घेतल्याने शहरात खळबळ उडाली. यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण आहे.
Nanded Dog Bite Case
Nanded Dog Bite CaseSakal
Updated on

तामसा : तामसा शहरातील विविध भागात गुरुवारी (ता. २५) पिसाळलेला कुत्र्याने दहा जणांना चावा घेतल्याने शहरात खळबळ उडाली. यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने जुने बसस्थानक परिसरात आताऊल्लाखान अजीजखान पठाण (वय ५४) यांना खाली पाडून गळ्याचा चावा घेतला.

एकाच तासात या कुत्र्याने सय्यद निसार सय्यद मुजीफ (वय ४६) विनोद शिरडकर (वय २८) संतोष तलवारे (वय २३) सिद्रा सद्दाम (वय १२) अक्रम शेख आयाज(वय ५) गंगाधर कदम (वय ४२) शेख अहमद उस्मान (वय ४०) आर्षद खान पठाण (वय ६२) आयरा मझर पठाण (वय ५) यांना गंभीर जखमी केले.

Nanded Dog Bite Case
Nanded News : आरोग्यदायी रानभाज्या बाजारात दाखल; अंबाडी, कर्टुले, करवंदाला नागरिकांकडून मोठी मागणी

जखमींवर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात या घटनेनंतर जुने बसस्थानक, डॉ. हेडगेवार मार्केट, बिलालनगर, भुसार मार्केट भागात भितीचे वातावरण पसरले. नागरिक पिसाळलेल्या कुत्र्याच्या भितीपोटी घराबाहेर पडत नव्हते. कुत्रा चावलेल्यात लहान मुलांची संख्या जास्त आहे. शहरातील विविध भागात मोकाट कुत्र्यांचा मुक्त वावर असून ग्रामपंचायत मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात असमर्थ ठरल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com