नांदेड - ‘सरकारला शेवटची विनंती आहे, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या. सगेसोयऱ्यांबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी करा. आम्ही तुम्हाला कधी विरोधक मानले नाही.
पण जर छगन भुजबळ यांचे ऐकून मराठा समाजावर अन्याय करत असाल, षडयंत्र रचत असाल तर विधानसभेच्या आगामी निवडणुकीत २८८ जागा पाडायच्या की उमेदवार उभे करायचे हे ठरवू,’ असा सूचक इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.
संवाद दौऱ्यानिमित्त जरांगे सोमवारी नांदेडमध्ये होते. सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता फेरी काढण्यात आली. या फेरीत मोठ्या प्रमाणावर समाजबांधव सहभागी होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.