प्रादेशिक परिवहन कार्यालयात गर्दी करु नका- आरटीओ

file photo
file photo
Updated on

नांदेड : कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घोषित केलेल्या विविध झोनमधील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये करावयाच्या कामकाजाची यादी घोषित केली. ही कामे करतांना नमूद बाबींच्या पुर्ततेची खात्री झाल्यानंतर कार्यालयातील कामे सुरु होणार असून अर्जदारांनी कार्यालयात गर्दी करु नये, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

राज्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत असून याबाबत निर्देश जारी करण्यात आले आहेत. सद्य: स्थितीमध्ये राज्याची जिल्हानिहाय विभागणी रेड झोन व रेड झोन व्यतिरिक्त अशी करण्यात आली आहे. परिवहन आयुक्त यांच्या आदेशानुसार परिवहन कार्यालय सुरु करण्याबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत.

विविध झोनमधील कार्यालयांमध्ये करावयाच्या कामकाजाची यादी

राज्य शासनाने घोषित केलेल्या विविध झोनमधील कार्यालयांमध्ये करावयाच्या कामकाजाची यादी पुढीलप्रमाणे दिली आहे. कंसाबाहेर काम तर (कंसात रेड झोन वगळून इतर क्षेत्रामधील कार्यालय) नवीन वाहनांची नोंदणी (होय), वाहन विषयक कामे जसे- वाहन हस्तांतरण, कर्ज बोजा चढविणे- उतरविणे इत्यादी (होय), योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण (होय), परवाना विषयक कामे (होय), शिकाऊ अनुज्ञप्ती (नाही), पक्की अनुज्ञप्ती (नाही), अनुज्ञप्ती विषयक इतर कामे जसे- दुय्यमीकरण, नुतनीकरण इत्यादी (होय), अंमलबजावणी विषयक मो. (होय). ही कामे करतांना पुढील बाबींच्या पुर्ततेची खात्री झाल्यानंतर कामे करण्याबाबत सूचित केले आहे.

अर्जदाराचे अर्ज कार्यालयात स्विकारण्यात येणार आहेत

सर्व वाहनधारकांनी मोटार वाहन कर अनिवार्यपणे ऑनलाईन पद्धतीने भरणा करावयाचा आहे. रेड झोन वगळून इतर कार्यक्षेत्रामध्ये वाहन विषयक व कामांकरिता ऑनलाईन अपॉइंटमेंट (स्लॉट) ची पध्दतीने अर्ज घेण्याबाबत सूचित केले आहे. त्यानुसार नमूद सूचित केलेले कामकाजाचे अर्ज हे ऑनलाईन अपाइमेंट (स्लॉट) ज्या दिनाकांस प्राप्त झाली आहे, त्याच दिवशी अर्जदाराचे अर्ज कार्यालयात स्विकारण्यात येणार आहेत. 

दोन व्यक्तीमध्ये किमान सहा फुटाचे अंतर ठेवण्यात यावे

दोन व्यक्तीमध्ये किमान सहा फुटाचे अंतर ठेवण्यात यावे. एका व्यक्तीकडून एकच अर्ज स्विकारण्यात येणार आहे. प्राप्त झालेली कागदपत्रे ही निर्जतुकीकरण (सॅनिटाईज) केल्यानंतर व कमीतकमी हाताळण्याबाबत सूचित केले असल्यामुळे नमूद कामकाजासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयास प्राप्त झालेले अर्ज हे विहित कालमर्यादेमध्ये होणार असल्यामुळे अर्जदारांनी कार्यालयामध्ये गर्दी करु नये असे आवाहन करण्यात येत आहे. 

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी कळविले

कार्यालयामध्ये योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी येणाऱ्या वाहनाचे निर्जतुकीकरण (सॅनिटाईज) पुर्णत: वाहन मालकाच्या किंवा धारकाच्या खर्चाने करुन वाहन योग्यता प्रमाणपत्राच्या नुतनीकरणासाठी सादर करावयाचे आहे. याबाबींच्या पुर्ततेची खात्री झाल्यानंतर कार्यालयातील कामे सुरु होणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.