सार्वजनिक बससेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी ‘वंचित’चे डफली बजाओ आंदोलन

Nanded Photo
Nanded Photo
Updated on

नांदेड - वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (ता.१२) वर्कशॉप येथील विभागीय नियंत्रक कार्यालयापुढे सार्वजनिक बससेवा आणि शहर बससेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी डफली बजाओ आंदोलन केले. तत्पूर्वी जगप्रसिद्ध शायर राहत इंदौरी, वंचितचे युवा नेते रणजित शंकरपाळे आणि नागपूर येथील दिवंगत बनसोडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात एसटी महामंडळाची चाके राज्यात बंद पडली आहेत. महामंडळाचा महसूल बुडत आहे. एसटी कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. कामगारांच्या हातात पगार येत नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या उदरर्निवाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बससेवा सुरु करण्यासाठी राज्यभर डफली बजाव आंदोलन सुरु केले आहे. 

विभागीय नियंत्रक अविनाश कचरे यांना  निवेदन

'वंचित'तर्फे सकाळी दहा वाजता नांदेड विभागीय नियंत्रक कार्यालय वर्कशॉप येथे डफली बजाओ आंदोलन करण्यात आले. चार तास चाललेल्या आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांनी समांतर अंतर पाळत आंदोलन केले. त्यानंतर विभागीय नियंत्रक अविनाश कचरे यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले, राष्ट्रीय प्रवक्ते फारुख अहेमद आदीतर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारूक अहमद, जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपली मनोगते व्यक्त केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात एसटी महामंडळाची चाके राज्यात बंद पडली आहेत. महामंडळाचा महसूल बुडत आहे. एसटी कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे त्यामुळे सर्वार्थाने जनजीवन विस्कळित झाले आहे. राज्य परिवहन महामंडळाची बससेवा पूर्ववत झाल्याशिवाय महाराष्ट्रात जनजीवनाचा गाडा व्यवस्थित चालू शकणार नाही. त्यामुळे ही मागणी वंचित बहुजन आघाडी नेटाने पुढे करणार असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यांची होती उपस्थिती 

नांदेड येथे झालेल्या डफली बजावो आंदोलनात भदंत पैंय्याबोधी, नांदेड उत्तरचे शहराध्यक्ष आयुबखान, महासचिव श्याम कांबळे (दक्षिण), विठ्ठल गायकवाड, साहेबराव बेळे, चंद्रकला चापलकर, रेणुकाताई दिपके, रामचंद्र सातव, अशोक कापशीकर, उमेश ढवळे, डॉ. संघरत्न कुर्हे, के. एच. वने, प्रतीक मोरे, संजय निवडूंगे, पद्माकर सोनकांबळे, कौशल्याबाई रणवीर, संदीप वने, केशव कांबळे, कैलास वाघमारे, काजी एजाज, राज आटकोरे, देवानंद सरोदे, ऑटो युनियनचे अहमद भाई बागवाले, गयाताई कोकरे, मीनाक्षीताई धनजकर, जयदीप पैठणे, राहुल सोनसळे, सुनील सोनसळे, शहजाद जाफरी, इमरान भाई, अब्दुल समी, इन्साफचे मोहम्मद अजहर, ॲड. अनुप आगाशे, ॲड. यशोनील मोगले, नागसेन गोळेगावकर, अतिश ढगे, रवी हाडसे, अतिश चव्हाण, डॉ. संतोष वाठोरे, डॉ. सिद्धार्थ भेदे, शेख इब्राहिम, आकाश जोंधळे, महेंद्र सोनकांबळे, केशव सदावर्ते, आदित्य देशमुख, शेख युसूफ, अब्दुल गफार, सय्यद सिराज, मोहम्मद महराज, अब्दुल हलीम शाकीर, आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.