Nanded News : जिल्हा परिषदेत ‘ई - फाईलिंग’ सुरू ; प्रायोगिक तत्वावर शिक्षण, आरोग्य विभाग ऑनलाइन

जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम तसेच अन्य ग्रामीण भागातील लोकांचे कामकाजासाठीचे हेलपाटे वाचावेत, यासाठी जिल्हा परिषदेने विविध विभागातील प्रलंबित संचिकांसाठी ई - फाईलिंग ट्रॅगिंक सिस्टिमचा प्रयोग राबविण्यास सुरूवात केली आहे. सध्या गेल्या आठवड्यापासून प्रायोगिक तत्वावर शिक्षण आणि आरोग्य विभागाचे काम सुरू करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी याबाबत नियोजन केल्यामुळे अधिकारी, कर्मचारी कामाला लागले आहेत.
nanded
nandedsakal
Updated on

नांदेड : जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम तसेच अन्य ग्रामीण भागातील लोकांचे कामकाजासाठीचे हेलपाटे वाचावेत, यासाठी जिल्हा परिषदेने विविध विभागातील प्रलंबित संचिकांसाठी ई - फाईलिंग ट्रॅगिंक सिस्टिमचा प्रयोग राबविण्यास सुरूवात केली आहे. सध्या गेल्या आठवड्यापासून प्रायोगिक तत्वावर शिक्षण आणि आरोग्य विभागाचे काम सुरू करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी याबाबत नियोजन केल्यामुळे अधिकारी, कर्मचारी कामाला लागले आहेत.

जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेची ओळख आहे. या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेची कामे होत असतात. मात्र, काही वेळेला कामे होत नसल्यामुळे गावकऱ्यांना नांदेडला जिल्हा परिषदेत यावे लागते. त्यामध्ये किनवट, माहूर, देगलूर, मुखेड असे तालुके आणि त्यातील गावे ही शंभर ते दोनशे किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे त्या भागातील गावकऱ्यांना नांदेडला जिल्हा परिषदेत येणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही, तसेच वेळही म्हणजेच एक दिवसच खर्च होतो. ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी ई - फाईलिंग ट्रॅकिंग सिस्टिम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नियोजन केले आहे.

nanded
Nanded News : माहूरच्या ॲट्रॉसिटी प्रकरणाला वेगळे वळण ; सरपंचपतीसह पोलिस पाटलांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

याबाबत जिल्हा परिषदेतील प्रमुख अधिकारी आणि विभागप्रमुख यांची बैठक घेऊन आढावा घेण्यात आला. तसेच प्रायोगित तत्वावर सर्वांत मोठी आस्थापना आणि काम असलेल्या शिक्षण आणि आरोग्य विभागात ही योजना राबविण्याचे ठरले. त्यानुसार प्राथमिक, माध्यमिक शिक्षण तसेच आरोग्य विभागात काम सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार या विभागातील अधिकारी, विभागप्रमुख आणि कर्मचारी कामाला लागले आहेत.

६९ कर्मचाऱ्यांना लॉगिन आयडी

ई - फाईलिंग ट्रॅकिंग सिस्टिमनुसार प्राथमिक शिक्षण विभागातील ३२, माध्यमिक शिक्षण विभागातील बारा आणि आरोग्य विभागातील २५ अशा एकूण एकूण ६९ कर्मचाऱ्यांना या सिस्टिममध्ये काम करण्यासाठी लॉगिन आयडी देण्यात आला आहे. त्यानुसार त्यांचे काम सुरू झाले आहे.

विभागात येणारी संचिका ऑनलाइन

ई - फाईलिंग ट्रॅकिंग सिस्टिमनुसार आता शिक्षण आणि आरोग्य या विभागात नव्याने दाखल होणाऱ्या संचिका या ऑनलाइन असतील. त्यासाठी प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांना लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळाले आहेत. त्यानुसार त्यांनी काम करायचे आहे. या सिस्टिममध्ये प्राथमिक शिक्षण विभागातील ५९ संचिका, माध्यमिक शिक्षण विभागातील २६ संचिका तर आरोग्य विभागातील ४२ अशा एकूण १२७ संचिकांची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.