बिलोली : रात्रीच्या वेळी चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या कुंडलवाडी येथील आरोपीस बिलोली येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीमती आर.बी. सोरेकर यांनी सोमवारी (ता.१८) आठ महिने साधा कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की कुंडलवाडी येथील श्रीनिवास देवराव पांचाळ याने ता.२० जुलै २०२३ रोजी पहाटेच्या सुमारास दिवसभर भिक्षा मागून कुंडलवाडी येथील समाधान हॉटेलच्या सेडमध्ये आराम करत असलेल्या इसमांना चाकूचा धाक दाखवून त्यांनी दिवसभर जमा केलेले नऊशे रुपये बळजबरीने काढून घेतल्याप्रकरणी बिलोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी पूर्ण करून दोषारोपपत्र बिलोलीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे दाखल केले.सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्याचा विचार करून तसेच सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस आठ महिने साधा कारावास एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास नऊ दिवसाच्या वाढीव कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकारतर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता रवीकिरण इंदुरकर यांनी बाजू मांडली. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून रामचंद्र पचलिंग यांनी काम पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.