Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून एकही पात्र महिला वंचित राहू नये; गिरीश महाजन

महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण-शहरी भागातील गरीब महिलांच्या आर्थिक विकासासाठी ही योजना महत्त्वाची आहे. या योजनेला सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanaesakal
Updated on

Nanded News : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना समाजातील सर्व घटकांसाठी आहे. या योजनेतून एकही पात्र महिला लाभार्थी वंचित राहणार नाही, याची काळजी गावस्तरावर ग्राम समितीने आणि शहरात वॉर्ड समितीने घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण-शहरी भागातील गरीब महिलांच्या आर्थिक विकासासाठी ही योजना महत्त्वाची आहे. या योजनेला सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्य शासनाने या योजनेची अर्ज प्रक्रिया सुलभ केली आहे. शुक्रवारी (ता.१२) जुलै रोजी नव्या शासन निर्णयात काही सुलभ पद्धती सुचविल्या आहेत. या पद्धतींची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे महाजन यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनात जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या सहभागात या योजनेच्या अंमलबजावणीचे काम अतिशय उत्तम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत नियमित आढावा आपण घेत असून जिल्ह्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश आपण दिल्याचे त्यांनी सांगितले.

वर्षाला १८ हजार रुपये मिळणार

योजनेबाबत कोणत्याही नकारात्मकतेला महत्त्व न देता, सर्व समाजातील महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या योजनेमुळे महिन्याला दीड हजार रुपये, वर्षाला १८ हजार रुपये प्रत्येक पात्र महिलेस मिळणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पुरुषाने आपल्या घरातील पात्र महिला भगिनींना योजनेचा लाभ मिळवण्यासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन महाजन यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.