नांदेड - कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे त्याबाबतच्या भीतीची देखील चर्चा नांदेडकरांमध्ये वाढू लागली आहे. त्यामुळे नांदेडकरांनो, आता तरी व्हा सावध...नाहीतर व्हाल सावज...अशी म्हणण्याची वेळ आली आहे. तसेच आता अधिक दक्ष राहून सार्वजनिक जीवनमान सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे.
लॉकडाउनचे एक एक टप्पे जसजसे शिथिल होत आहेत त्या प्रमाणात नागरिक सार्वजनिक जीवनाच्या व्यवहाराला पूर्ववत करु पाहत आहेत. सार्वजनिक जीवनमान सुरक्षित राहावे, यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणे प्रशासनाला क्रमप्राप्त आहे. ही अंमलबजावणी करताना नागरिक म्हणून आपले कर्तव्य देखील चोखपणे बजावणे अत्यावश्यक आहे.
सकारात्मक सहभाग हवा
नांदेड शहर आणि जिल्ह्यातील जीवनमान अधिक सुरक्षित, सौहार्दपूर्ण व्हावे, यासाठी लोकाभिमुख प्रक्रियेबाबत आपला सहभाग अधिक सकारात्मक व्हावा, यासाठी प्रत्येकाने आपआपल्या पद्धतीने सकारात्मक प्रयत्न करणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. विपीन, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन यांच्यासह अधिकारी, कर्मचारी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी प्रशासनाच्या पातळीवरुन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन सहभाग नोंदविण्याचे काम प्रत्येक नागरिकांचे आहे.
रुग्णांची संख्या वाढल्याने भीती
नांदेड शहरासह जिल्ह्यातही काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने दक्ष राहून काळजी घेणे आवश्यक आहे. नांदेड शहर आणि जिल्हा कोरोनामुक्त होण्यासाठी प्रत्येकाने सहभाग घेऊन शासनाच्या सूचनांचे पालन करणे त्याचबरोबर स्वतः काळजी घेणे गरजेचे आहे. गुरुवारी (ता. ११) दिवसभरात कोरोनाचे २१ रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. त्याचबरोबर रुग्ण नवीन भागात आढळून येत असल्याने त्या दृष्टीनेही काळजी घेणे महत्वाचे आहे. फक्त भीती बाळगून उपयोग नाही तर कोरोना आपल्या दारात आणि घरात येऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेही आवश्यक आहे.
हेही वाचलेच पाहिजे - हिंगोली जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी -
जिल्ह्याची कोरोनाविषयी संक्षीप्त माहिती (ता. ११ जूनपर्यंत)
‘आरोग्य सेतू ॲप’ करा डाऊनलोड
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर ‘आरोग्य सेतू ॲप’ डाऊनलोड करुन घ्यावे. जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल.
- डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा शल्य चिकित्सक, नांदेड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.