नांदेड : जिल्हा परिषद समाजकल्याण अंतर्गत दलितवस्ती नियोजनावरुन सत्ताधारी महाविकास आघाडीतील पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये चांगलेच खटके उडाले. पण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांना स्वपक्षातील नाराजांची मनधरणी करण्यात यश आले.
समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार लॉकडाउन कालावधीत रजेवर असल्याने ऐन वेळी प्रभारी अधिकाऱ्याची नेमणूक करत दलितवस्तीच्या यादीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
सत्ताधाऱ्यांच्या दलितवस्ती निर्णयाविरोधात भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या पुनम पवार यांनी न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, सोमवारी (ता. आठ जून) हजर झालेले समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांना प्रशासनाकडून रोखण्यात आले. लॉकडाउन कालावधीत अर्जीत रजेच्या कारणावरुन पदभारापासून रोखण्यात आल्याने श्री. आऊलवार स्वत: रुजू झाले.
श्री आऊलवार दलितवस्तीच्या ५२ कोटी रुपये निधी नियोजनामधील त्रुटी समोर आणतील, या उद्देशाने त्यांना पदभारापासून रोखल्याची चर्चा सुरू असताना एका अपंग शाळेच्या शिक्षकाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा - हरभरा खरेदी केंद्र सुरूच राहणार.....कुठे ते वाचा
कथित ऑडिओ क्लिपमध्ये एका अपंंग शाळेचा शिक्षक दुसऱ्या शिक्षकाशी संवाद साधताना अपंग शाळाची मान्यता रद्द झाल्याचे सांगत समाज कल्याण कार्यालयातील निरिक्षक श्री. मोरे, श्री. आऊलवार यांचा उल्लेख करत आहे. सबंधीत कर्मचारी श्री. आउलवार यांना भेटयला गेलो असता त्यांनी आत्मदहन करणारे तुम्हीच का? यावर तो कर्मचारी म्हणतो की, आम्ही वीस ते पंचवीस कर्मचारी आहोत. त्यावर आउलवार यांनी काय होईल मेल्याने? असे म्हणत उद्धट भाषा वापरल्याचे उल्लेख करत आहे.
श्री. आउलवार यांनी दिलेल्या वागणुकीवर संताप व्यक्त करत त्या शिक्षकाने एका पदाधिकाऱ्याचा कक्ष गाठून घडला प्रकार कथित केला. त्यानुसार पुरावे आहेत पण पुढे कोण होणार? असा प्रश्न पदाधिकाऱ्याने उपस्थित करताच संतप्त शिक्षकाने पुढे होण्यास संमती दर्शवली.
त्यानंतर पुराव्यासह समाज कल्याण आयुक्त (पुणे), जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, समाज कल्याण सभापती यांच्याकडे तक्रार दाखल केल्याचे सांगत आहे. कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग दलितवस्ती नियोजनानंतर पुन्हा चर्चेत आला आहे.
येथे क्लिक करा -शैक्षणिक बांधिलकी जोपासणारा अक्षर परिवार
सगळ्यांनीच बोलण्यास दिला नकार
या कथित आॅडिओ क्लिपबाबत शहानिशा करण्यासाठी संबंधित विभाग आणि त्यांच्या पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांशी विचारणा केली असता कुणीच काहीच बोलायला तयार नाही. सगळे गप्प असून सगळ्यांनीच याबाबत हात वर करत अधिक बोलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पुन्हा त्याचीही चर्चा रंगली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.