नांदेड : येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानी सोमवारी (ता. चार) ते मंगळवारी (ता. पाच) रात्री धाडशी कारवाई केली. या कारवाईत ६०० लिटर हातभट्टी, २० दुचाकी, एक चारचाकी वाहन आणि ३२ आरोपींना अटक केली. चिकाळा तांडा (ता. मुदखेड) परिसरात उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन आणि पोलिस अधीक्षक विजयुकमार मगर यांनी या विभागाचे कौतुक केले. या कारवाईत मात्र आरोपींचा पाठलाग करताना दोन कर्मचारी जखमी झाले.
लॉकडाउनमध्ये मुदखेड तालुक्यातील पांडूरना, चिकाळा तांडा, उमाटवाडी आणि नांदेड तालुक्यातील पुणेगाव व वाजेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध हातभट्टीची वाहतुक होत असल्याची गुप्त माहिती अधीक्षक निलेश सांगडे यांना मिळाली. त्यांनी रात्री आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुचना देऊन गस्तीवर पाठविले. या पथकांनी चिकाळा तांडा परिसरात सापळा लावला. यावेळी दुचाकीवरून लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, नांदेड जिल्ह्यात विक्री करण्यासाठी काही जण हातभट्टी घेऊन निघाले होते.
हेही वाचा - पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पतीने उचलले हे पाऊल..
१४ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त
सापळा लावून बसलेल्या पथकानी त्यांना अडविले. तपासणी केली असता त्यांच्याकडे हातभट्टी सापडली. पथकांनी पुन्हा अंधारात दबा धरुन बसल्यानंतर एकामागोमाग अशा २० दुचाकी व एक चारचाकी वाहने आली. या सर्वांकडून ६०० लीटर हातभट्टी जप्त केली. तसेच हातभट्टी वाहतु करणारे सर्व २१ वाहने असा १४ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी एक जण पळून जात असतांना त्याचा पाठलाग करणारे दोन जवान जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
येथे क्लिक करा - उच्च न्यायालयाच्या ‘काय’ आहेत गाईडलाईन...? वाचा सविस्तर
या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतले परिश्रम
सदर कारवाईमध्ये निरिक्षक एस. एस. खंडेराय, एस. एम. बोदमवाड, पी. ए. मुळे, दुय्यम निरिक्षक भगवान मंडलवार, टी. बी. शेख, योगेश लोळे, अमोल शिंदे, सहाय्यक दुय्यम निरिक्षक के. के. कीरतवाड, व्ही. टी. खिल्लारे, मोहम्मद रफी आणि जवान प्रविण इंगोले (जखमी), विकास नागमवाड (जखमी), श्री. नांदुसेकर, श्री. बालाजी पवार, श्री. भालेराव, श्री. दासरवार, श्री. अंनकाडे, श्री. भोकरे, श्री. नंदगावे, श्री. नारखेडे, श्री. राठोड, श्री. सुरनर, वाहन चालक श्री. संगेवार, रावसाहेब बोदमवाड आणि श्री. जाधव यांनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.