नांदेड : राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून जिल्हयातील वसंतराव नाईक तांडावस्तीच्या विकासासाठी तब्बल दोन कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हयातील ४१ तांड्यांचा चेहरा-मोहरा बदलणार आहे.
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागाचा विकास पाहिजे तसा होताना दिसत नाही. त्यातल्या त्यात तांडा, वस्त्यांचातर विकास काहीच होताना दिसत नाही. परिणामी तांडा, वस्त्यांवरील नागरिकांना दररोजच असंख्य संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये रस्त्यांचा अभाव, विजेचा अभाव, मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शाळांचा अभाव, रस्ते नसल्याने वाहतुक व्यवस्थेचा प्रश्न अशा असंख्य समस्यांना वाडी, तांडे, वस्त्यांवरील नागरिकांना रोजच सामना करावा लागत आहे.
पालकमंत्री अशोक चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. त्यामुळे शासनाच्या विविध योजना जिल्हयातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविण्याकडे त्यांचा प्रयत्न आहे. जिल्हयामध्ये मोठया प्रमाणात बंजारा समाजाच्या तांड्यांची व वस्त्यांची संख्या आहे. या तांड्यांवर मूलभूत सुविधा पुरविल्या जाव्यात यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शासनाकडे निधी प्राप्त होण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाचा पाठपुरावा पालकमंत्री यांनी करुन दोन कोटी ६७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन घेतला आहे.
हे देखील वाचाच - नांदेड सलग तिसऱ्या दिवशी त्रिशतकपार, शनिवारी ३७० जण पॉझिटिव्ह
शासनाकडून उपलब्ध झालेल्या या निधीचे योग्य उपयोजन व्हावे यासाठी श्री. चव्हाण यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जिल्हा परिषदेचे समालकल्याण सभापती अॅड. रामराव नाईक, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रोहिदास जाधव, युवक काँग्रेस सचिव विनोद चव्हाण चिदगिरीकर यांच्यावर जबाबदारी दिली आहे. त्यानुंषंगाने शिष्टमंडळाने शनिवारी (ता.पाच) मुदखेड तालुक्यातील नागेली व बारड परिसरातील गोब्रा नाईक तांडा व तोरना तांडा या बंजारा वस्त्यांना भेटी देऊन येथील नायक व कारभारी यांच्याकडे शासन निर्णयाची प्रत दिली.
हे तर वाचलेच पाहिजे - महाविद्यालयांची दारे उघडण्यासाठी घंटानाद करण्याचा इशारा...कुठे ते वाचा
या तांड्यांचा आहे समावेश
मोखंडी, चितगिरी, जांबदरी, सोमठाणा, पांडुर्णा, जांभळी, देवठाणा, तांडवी, सावरगाव मेट, दिवसी खु., जाकापूर, कोंडदेवनगर, थेरबन,शिवनगर, धावरी खु., खुदळा, जुना, महादेव, धनुनाईक, सेवादासनगर, जयपूर, बेंद्री, जगराम, सोसायटी, शिवनगर, बल्लाळ, म्हैसूर, तोरणा, गोब्रा, राजवाडी, सरकळी, रोहि पिंपळगाव, चिकाळा लहान व मोठा, दरेगाव, वर्दळा, धनगरवस्ती, शिराढोण, वाखरडवाडी, आडगाव, मांजरी या गावांच्या परिसरातील तांड्यांचा समावेश आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.