चार पायली धान्यावरच चालायचा कुटुंबाचा गाडा, कोणाचा? ते वाचा  

File photo
File photo
Updated on

नांदेड : सलूनला आता ग्लॅमर आले असून पार्लरमध्ये रुपांतरित झाले असले तरी त्याचा पूर्व इतिहास बघितल्यास या व्यवसायाला खडतर प्रवासातून थोडाफार का होईना अच्छे दिन आल्याचे दिसून येत आहे. 

बारा बलुतेदार व्यवसायानुसार समाजात न कळत निर्मिती झाली. यातूनच प्रत्येक बलुतेदाराला ओळख निर्माण झाली. यामध्ये सर्वात महत्त्वाचा एक बलुतेदार म्हणजे न्हावी. ग्रामीण भागात या बलुतेदाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज इतर जमातीही या व्यवसायात व्यावसायिक म्हणून उतरले असले तरी पूर्वीच्या काळी याचा खडतर प्रवास बघणे महत्त्वाचे आहे.

प्रभावी व्यक्तिमत्वात दाढी, कटिंग हा महत्त्वाचा भाग. पूर्वीच्या काळी हा व्यवसाय केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी व कुटुंबाचा उदरनिर्वाह, चालविण्यासाठी होता. आधुनिक तंत्रज्ञान विकसित नसल्याने त्या काळात पट्टीचे वस्तरे असायचे. सोबत एक केस कापण्याची कैची व स्प्रिंग मशिन असायची. हे वस्तरे निशाच्यावर घासून दिवसभर मेहनत करायचे. साधे पोते जमिनीवर टाकून गावातील बच्चे कंपनी व नागरिक कटिंग व दाढी करायचे. पूर्ण गावातील गप्पा गोष्टी व्हायच्या.  कुणी आजारी, म्हातारी किंवा श्रीमंत व्यक्ती असेल तर त्यांच्या घरी जाऊन सेवा द्यायचे.

धान्याच्या स्वरूपात चालायचा व्यवसाय
कटिंग म्हटले की बच्चे कंपनीच्या अंगावर काटे यायचे. आजही येतात.  दोन्ही पायांच्या मध्यात मुंडके ठेवून स्प्रिंग मशिनने कटिंग करायचे. यावेळी बालक खूप रडत असले तरी घरच्यांना मजा यायची. अनेकजण लवकर कटिंग न करण्यासाठी टक्कल करायचे. त्यावेळी दाढी, कटिंगचा मोबदला आर्थिक स्वरूपात न घेता धान्य स्वरुपात राहायचा. वार्षिक मोबदला चार पायल्या धान्य (बारा किलो) असायचे. गावात पाहुणे आले तर या मोबदल्यातच त्यांचीही दाढी, कटिंग करावी लागत असे. असे असले तरी न्हावी बांधव अतिशय कठीण परिस्थितीत सुद्धा सेवा देण्यास तत्पर राहायचे. 

दुकाने उघडायला परवानगी द्यावी
सध्या नांदेड जिल्हा आॅरेंज झोनमध्ये असल्याने नाभिक समाजाला सकाळी आठ ते एक या वेळेमध्ये दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी. कारण गेल्या दीन महिन्यापासून सलूनची दुकाने बंदच असल्यामुळे या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत सलून व्यावसायिक असून, आम्हाला अर्धा दिवस तरी दुकाने उघडण्यासाठी परवानगी द्यावी, असी मागणी शहरातील सलून व्यावसायिकांनी केली आहे.  
 

आव्हाने व स्पर्धा वाढली
जुन्या काळातील आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी कुठलाही सोयीसुविधा उपलब्ध होत नव्हत्या. खुप अडीअडचणींचा सामना करत संपूर्ण कुटुंबाचा गाडा चालावा लागे. अशावेळी अलिकडे सुविधा उपलब्ध असल्या तरी आव्हाने व स्पर्धा वाढली आहे.
- कचरु सुरडकर (सलून व्यावसायिक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.