नांदेड : उन्हाळी हंगामात २२ हजार हेक्टरवर पेरणी

जिल्ह्यातील चित्र; उन्हाळी सोयाबीन, भूईमुग, तीळ, मका, ज्वारीचा समावेश
farmer agricultural news summer crops sowing status in nanded
farmer agricultural news summer crops sowing status in nandedsakal
Updated on

नांदेड : जिल्ह्यात रब्बी हंगामात झालेल्या विक्रमी पेरणीनंतर शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात २२ हजार ३९४ हेक्टरवर पेरणी केली आहे. यात सर्वाधीक सात हजार हेक्टरवर उन्हाळी सोयाबीनचा समावेश आहे. या सोबतच भूईमुग, तीळ, मका, ज्वारी पिकांची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात मागील वर्षी पावसाळ्याच्या पाच महिन्यात वार्षिक सरासरीपेक्षा १३६ टक्के पाऊस झाला होता. यामुळे जिल्ह्यातील लहान, मध्यम व मोठ्या प्रकल्पांसह कोल्हापूरी बंधारे, उच्च पातळी बंधार्‍यात शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. परिणामी जमिनीतील जलस्त्रोत बळकट झाल्याने रब्बीत जिल्ह्यात एक लाख ४० हजार २२३ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असताना रब्बीची अंतिम पेरणी २५४ टक्यानुसार तीन लाख ५७ हजार ४७५ हेक्टरवर झाली होती.

यात सर्वाधिक दोन लाख ७९ हजार ४१३ हेक्टरवर हरभर्‍याचा समावेश होता. यानंतर जलसंपदा विभागाने उन्हाळी हंगामासाठी पाण्याचे नियोजन केल्यामुळे शेतकर्‍यांनी २२ हजार ३९४ हेक्टरवर उन्हाळी हंगामात पेरणी केली आहे. यात उन्हाळी सोयाबीन - सहा हजार ९२१ हेक्टर, उन्हाळी ज्वारी - चार हजार २६६ हेक्टर, मका - दोन हजार २२५ हेक्टर, उन्हाळी भात - ४३० हेक्टर, उन्हाळी भुईमुग - पाच हजार ८१५ हेक्टर, उन्हाळी तीळ - दोन हजार ८०७ हेक्टर, सुर्यफुल - चार हेक्टर अशी एकूण पेरणी २२ हजार ३९४ हेक्टरवर झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()