उमरी : दिवाळीचा सण तोंडावर असल्यामुळे शेतकरी उमरी बाजारातील व्यापाऱ्यांच्या आडतीवर सोयाबीन विक्रीसाठी आणत आहेत. सोयाबीनची मशिनव्दारे तपासणी करूनच भाव ठरवला जातो. सध्या तेलाचे भाव महागले आहेत. मात्र, सोयाबीनचा भाव कमी का? असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. तेलाचे भाव वाढल्याने सर्वसामान्य कुटुंबाला आर्थिक झळ सोसावी लागत आहे. दुसरीकडे बाजारात नवीन मूग, उडीद, सोयाबीनसह शेतीमालाचे भाव कवडी विक्री होत आहेत.