Nanded : पीक विमा भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांनी ३ सप्टेंबरपर्यंत तक्रार करावी; जिल्हाधिकारी

२०२३ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ८ लाख १९ हजार ५९० शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी विमा काढला होता. गतवर्षीच्या जुलै व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी २ लाख ५० हजार २० दावे विमा कंपनीकडे दाखल केले होते.
Nanded : पीक विमा भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांनी ३ सप्टेंबरपर्यंत तक्रार करावी; जिल्हाधिकारी
Nanded : पीक विमा भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांनी ३ सप्टेंबरपर्यंत तक्रार करावी; जिल्हाधिकारी sakal
Updated on

नांदेड : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई न मिळाल्यासंदर्भात माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. आज त्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा प्रशासनाकडे मांडल्या. भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांनी ३ सप्टेंबरपर्यंत तालुका कृषि अधिकाऱ्यांकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.