नांदेड : जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठा नेता तथा राज्याचे माजी राज्यमंत्री गंगाधरराव कुंटूरकर (वय ८२) यांचे शनिवारी (ता. तीन) औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांच्यावर औरंगाबाद येथे एखा खासगी रुग्णालयात उपचार सुरु होता.
गंगाधरराव कुंटूरकर यांचा नांदेड जिल्ह्याच्या राजकारणावर अनेक वर्षे प्रभाव राहिला. काँग्रेस- राष्ट्रवादी व काही वर्षांपूर्वी ते भाजपमध्येही गेले होते. त्यांच्या राजकारणाची सुरुवात कुंटूरचे सरपंच पदापासून झाली. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, खासदार, जिल्हा बँकेचे संचालक तसेच राज्य सहकारी बँकेचे संचालक आणि राज्यमंत्री असे अनेक पदे त्यांनी भूषविली. त्यांचा जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा दबदबा राहिला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ते उभे होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते काल मतदानाला हजर राहू शकले नव्हते. शनिवार (ता. तीन) सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांचे औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
ग्रामीण भागाशी नाळ असलेला नेता- ना. चव्हाण
नांदेड- माजी खासदार गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांच्या राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झाली. खासदार, आमदार, राज्यमंत्री अशा विविध पदांवर काम करण्याचा सन्मान त्यांना प्राप्त झाला. ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांच्यासमवेतही त्यांनी काम केले. ग्रामीण भागाची नाळ असलेला नेता आपण गमावला आह. अशा शब्दांत नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी गंगाधरराव कुंटुरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांचे पुत्र राजेश देशमुख कुंटुरकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क करुन त्यांचे सांत्वन केले.
माजी राज्यमंत्री गंगाधरराव देशमुख कुंटूरकर काळाच्या पडद्याआड
जिल्ह्यातील एक राजबिंडे व्यक्तिमत्त्व, रुबाबदार खरा देशमुखी अंदाज असलेले व तरुणाला लाजवेल असं चेहऱ्यावर तेज व उत्साह असणारे नेते गंगाधरराव देशमुख कुंटूरकर हे आज काळाच्या पडद्याआड गेले. त्याना अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अश्या शब्दात माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कुंटुरकर साहेबानी सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदचे अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष , राज्य सहकारी बँक सदस्य व जय अंबिका सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि बिलोली विधानसभेचे आमदार, नांदेड लोकसभेचे खासदार, महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री इत्यादी व अनेक असे महत्त्वाचे पद भूषवली आहेत. त्यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली असून जिल्ह्यातील मोठे वलय असणारे व्यक्तीला आपण आज मुकलो असल्याची भावना सुभाष वानखेडे यांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.