नांदेडला गुरुवारी चारशे कोरोनाबाधितांची झाली नोंद

७२ जण झाले बरे; एक हजार ४३६ रुग्णांवर उपचार सुरु
Corona-patient
Corona-patientSakal media
Updated on

नांदेड : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी ४७४ नंतर गुरुवारी (ता.१३) प्राप्त झालेल्या एक हजार ६१८ अहवालापैकी चारशे जणांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती(nanded corona update) पुन्हा बिघडत असल्याचे चित्र आहे.गुरुवारी जिल्हाभरातील शासकीय व निमशासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांपैकी ७२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ९२ हजार १८९ इतकी झाली असून आत्तापर्यंत ८८ हजार ९८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बाधित रुग्णांपैकी मागील अनेक दिवसापासून एकाही गंभीर रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे गुरुवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील कोरोना आजाराने मृत्यू झालेल्यांची संख्या दोन हजार ६५५ वर स्थिर आहे. (Four hundred corona victims were reported in Nanded on Thursday)

Corona-patient
व्यावसायिकांची चिंता वाढली...

गुरुवारी नांदेड वाघाळा महापालीका(nanded carporation) हद्दीत २५१, नांदेड ग्रामीण २१, हदगाव तीन, लोहा नऊ, उमरी १२, हिमायतनगर एक, मुदखेड २३, किनवट नऊ, देगलूर एक, मुखेड सात, नायगाव एक, बिलोली तीन, धर्माबाद २०, भोकर एक, हिंगोली दोन, परभणी दहा, वाशीम एक, पुणे एक, अमरावती एक, अकोला चार, बीड एक, उत्तर प्रदेश दोन, कोल्हापूर एक, मुंबई दोन, हैदराबाद एक असे चारशे जणांचे अहवाल बाधित आले आहेत.

विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात(nanded district hospital) २७, जिल्हा कोविड रुग्णालय १२, नांदेड गृहविलगीकरणात(home quarantine) एक हजार ९१, नांदेड जिह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरणात २९१ तर, खासगी रुग्णालयात १५ असे एक हजार ४३६ बाधितांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी तीन बाधितांची प्रकृती गंभीर आहे.

Corona-patient
ऑनलाइन शिक्षणापेक्षा देशी दारूचा परवाना द्या

नांदेड कोरोना मीटर

  1. एकूण बाधित - ९२ हजार १८९

  2. एकूण बरे -८८ हजार ९८

  3. एकूण मृत्यू - दोन हजार ६५५

  4. गुरुवारी बाधित -४००

  5. गुरुवारी बरे - ७२

  6. गुरुवारी मृत्यू - शुन्य

  7. उपचार सुरु- एक हजार ४३६

  8. गंभीर रुग्ण - तीन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()