Nanded News : ‘आयुष्मान’ने सावरले संसार ; जनआरोग्य योजनेतून ८९ हजार रुग्णांवर मोफत उपचार

जिल्ह्यात केंद्र शासनाची आयुष्मान भारत प्रधानमंत्री आणि राज्याची महात्मा फुले जनआरोग्य योजना एकत्रित राबविण्यात येत आहे. या आयुष्मान जनआरोग्य योजनेतून आतापर्यंत ८९ हजार ८० लाभार्थ्यांना मोफत उपचार मिळाले आहेत.

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना
प्रधानमंत्री जनआरोग्य योजनाsakal
Updated on

नांदेड : जिल्ह्यात केंद्र शासनाची आयुष्मान भारत प्रधानमंत्री आणि राज्याची महात्मा फुले जनआरोग्य योजना एकत्रित राबविण्यात येत आहे. या आयुष्मान जनआरोग्य योजनेतून आतापर्यंत ८९ हजार ८० लाभार्थ्यांना मोफत उपचार मिळाले आहेत. यामुळे हजारो कुटुंबीय आर्थिक संकटातून सावरली.

जिल्ह्यातील दहा शासकीय आणि ३० खासगी अशा एकूण ४० रुग्णालयातून मोफत उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील आठ लाख ७८ हजार ७९१ जणांना आयुष्मान कार्ड देण्यात आले. केंद्र आणि राज्याच्या आदेशानुसार आयुष्मान योजनेतंर्गत सर्वांनाच आयुष्मान कार्ड देण्यात येत आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात जवळपास २२ लाख ८९ हजार ४४१ लाभार्थ्यांची नोंद झाली असून त्यापैकी आतापर्यंत आठ लाख ७८ हजार ७९१ जणांना आयुष्मान कार्ड देण्यात आले आहे.

उर्वरित लाभार्थ्यांनाही कार्ड देण्याचे काम सुरू असल्याची माहिती या योजनेचे जिल्हा समन्वयक अधिकारी डॉ. दीपेशकुमार शर्मा यांनी दिली. राज्यातील योजना ही २०१२ पासून तर केंद्राची योजना २०१८ पासून सुरू झाली आहे. या योजनेतंर्गत लाभ घेण्यासाठी रुग्णांना जिल्ह्यात ४० रुग्णालये आहेत. त्यापैकी दहा शासकीय आणि ३० खासगी रुग्णालये आहेत. नांदेड शहरात एक शासकीय आणि २९ खासगी तर ग्रामीण भागात नऊ शासकीय आणि एक खासगी देगलूर येथे रुग्णालय आहे. या ठिकाणी रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. १ एप्रिल २०२० पासून ते आजपर्यंत जिल्‍ह्यात ८९ हजार ८० लाभार्थ्यांनी या योजनेचा मोफत लाभ करून घेतला आहे. त्यात विविध शस्त्रक्रियांसह उपचारांचा समावेश आहे.

मराठवाड्यात नांदेड प्रथम

आयुष्मान योजनेचे राज्याचे समिती प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी नांदेडमध्ये या योजनेचा आढावा नुकताच घेतला. त्यात त्यांनी मराठवाडा विभागात नांदेड जिल्हा या योजनेत प्रथम आल्याची माहिती दिल्याचे डॉ. शर्मा यांनी सांगितले. योजनेसाठी जिल्हा परिषद, नगरपालिका आदी विभागांचीही मदत घेण्यात येत आहे.


प्रधानमंत्री जनआरोग्य योजना
Nanded News : सफाई कामगारांचे आंदोलन सुरू ; नांदेड महापालिका प्रशासनाला द्यावे लागणार लक्ष

सर्वांनाच मिळणार लाभ...

राज्य शासनाने ता. २८ जुलै रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील सर्वांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत पाच लाखापर्यंत मोफत उपचार असून एक हजार तीनशेहून अधिक विविध उपचार व शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. त्यासाठी सर्वांनी आयुष्मान कार्ड काढून घ्यावे. त्यासाठी आरोग्य मित्रांशी किंवा जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. तसेच लाभार्थी स्वतः ऑनलाइन अर्ज मोबाईलवरून करू शकतात, असे डॉ. दीपेशकुमार शर्मा यांनी सांगितले.

तालुकानिहाय लाभार्थी

  • नांदेड : २० हजार ७३८

  • मुखेड : ५,५३१

  • लोहा : ६,७६२

  • हदगाव : ७,२३८

  • किनवट : ४,०७०

  • कंधार : ५,६१२

  • अर्धापूर : ३,४५४

  • देगलूर : ४,०३१

  • नायगाव : ४,७१९

  • हिमायतनगर : २,५४८

  • बिलोली : ३,८६३

  • मुदखेड : ३,१८८

  • माहूर : २,३०६

  • उमरी : २,६५६

  • धर्माबाद : १,८३०

  • भोकर : २,९८६

  • एकूण : ८९ हजार ८०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.