नांदेड: जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २१) प्राप्त एक हजार ९६० अहवालापैकी ७१९ अहवाल कोरोनाबाधित(corona)आले आहेत. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या ९६ हजार ८५२ एवढी झाली असून यातील ९० हजार ३८२ रुग्णांना रुग्णालयातून(Nanded) सुटी देण्यात आली आहे. आजच्या घडीला तीन हजार ८१२ रुग्ण उपचार घेत असून यात तीन बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे सिडको येथील ७३ वर्षे वयाच्या महिलेचा गुरुवारी (ता.२०) उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६५८ झाली आहे. आजच्या बाधितांत नांदेड महापालिका हद्दीत ३५२, नांदेड ग्रामीण - ४३, भोकर - चार, देगलूर - ३१, धर्माबाद - १८, कंधार - १५, हदगाव - नऊ, किनवट - ७२, लोहा - सहा, मुदखेड - आठ, मुखेड - २२, नायगाव - सात, हिमायतनगर - तीन, बिलोली - २१, उमरी - ४५, अर्धापूर - पाच, माहूर - तीन, हिंगोली - पाच, परभणी - २९, अकोला - एक, हैदराबाद - एक, निझामाबाद - एक, औरंगाबाद - तीन, लातूर - एक, जालना - एक, नागपूर - एक, वाशीम - सहा, यवतमाळ - दोन, पुसद - एक, उमरखेड - दोन, अहमदनगर - एक असे एकुण ७१९ बाधित आढळले.
दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरीतील नऊ, नांदेड महापालिकातंर्गत गृह विलगीकरणातील ३९८, जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरणातील ६७, खासगी रुग्णालयात चार, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल तीन असे एकुण ४८१ बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुटी देण्यात आली. उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी २६, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल चार, जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ७०९, नांदेड महापालिकातंर्गत गृहविलगीकरण तीन हजार ४८, हदगाव - एक, खासगी रुग्णालय २२, बिलोली दोन असे एकुण तीन हजार ८१२ व्यक्ती उपचार घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.