Nanded News : नांदेड शहरात बुधवारपासून रंगणार बालनाट्य स्पर्धा

प्राथमिक फेरीमध्ये अकरा संघांचा सहभाग, दोन दिवस चालणार उपक्रम
from tomorrow in nanded start balnatya competition art artist drama
from tomorrow in nanded start balnatya competition art artist dramaSakal
Updated on

Nanded News : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे विसावी राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी नांदेड येथे येत्या बुधवारी (ता. दहा) आणि गुरुवारी (ता. ११) व्हीआयपी मार्गावरील कुसुम सभागृहात सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे. स्पर्धेत नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील एकूण अकरा संघांचा समावेश आहे.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी बुधवारी (ता. दहा) दुपारी बाराला येथील केंब्रिज माध्यमिक विद्यालयाचे ‘चिऊताई माझ्याशी बोल ना’ हे नाटक होईल. दुपारी सव्वाला परभणीतील बालगंधर्व सांस्कृतिक, कला,

क्रीडा व युवक मंडळातर्फे ‘काहीतरी चुकतंय वाटतंय’, दुपारी अडीचला नांदेडमधील ज्ञानभारती विद्यामंदिराचे ‘बुद्धाची गोष्ट’, दुपारी पावणेचारला जिंतूरच्या डॉ. सुभाषचंद्र राठी बालक विद्यामंदिराचे ‘मदर्स डे’, सायंकाळी पाचला पोखर्णीतील नृसिंह विद्यालयाचे ‘जड झाले ओझे’ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होईल.

गुरुवारी (ता. ११) सकाळी अकराला नांदेड येथील ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलतर्फे ‘एलियन्स द ग्रेट’, दुपारी बाराला राजाराम धर्माबाद येथील काकानी सहकार विद्या मंदिराचे ‘चिऊताई माझ्याशी बोल ना’, दुपारी सव्वाला नांदेडमधील शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्सचे ‘वडाळा ब्रिज’, दुपारी अडीचला येथील टायनी एंजल्स स्कूलचे ‘करामती पोर’,

दुपारी पावणेचारला परभणीतील राजीव गांधी युवा फोरमचे ‘जगण्याचा खो’ आणि सायंकाळी पाचला जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे (फुलकळस, परभणी) ‘गोष्टीची गोष्ट’ या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होईल.

नांदेड केंद्रावरील समन्वयक दिनेश कवडे यांनी ही माहिती दिली. स्पर्धेस उपस्थित राहून बाल कलावंतांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.