फरार पॉझिटीव्ह दुसरा रुग्ण पोलिसांच्या ताब्यात

korona virus desease logo.jpg
korona virus desease logo.jpg
Updated on

नांदेड  : गुरुव्दारा लंगर साहिबमधील वीस पॉझिटीव्ह चार रुग्ण फरास झाले होते. त्यापैकी एक फरार दोन दिवसापुर्वी सापडला होता. तर दुसरा रुग्णही शुक्रवारी (ता. आठ) दुपारी वजिराबाद पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांनी दिली.

वीस पैकी चार रुग्ण झाले होते फरार
गुरुव्दारा लंगर साहिब येथील वीस जणांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. यातील १६ रुग्णांना पोलिसांच्या मदतीने प्रशासनाने कोव्हीड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु त्यांच्यातील चार पॉझिटीव्ह रुग्ण फरार झाल्याने प्रशासनाची झोप उडाली होती. नांदेडकरामध्ये या प्रकरणी भितीचे वातावरण तयार झाले होते. याबाबत महानगरपालिका प्रशासनावर चौफेर टिका होत होती. तसेच या प्रकरणाची विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनीही दखल घेवून त्यांचा तत्काळ शोध घेण्याचे आदेश दिले होते. 

शोधासाठी पोलिस पथक
या कोरोनाग्रस्तांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके नेमली होती. या चारपैकी पहिला आरोपी रुग्ण बुधवारी (ता. सहा) लंगरसाहिब येथून पकडले होते. त्यानंतर चंद्रपूर आणलेल्या तिघांचा नांदेडच्या कोरोनाग्रस्तांशी संबंध नसल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी तपासाचे चक्र स्थानिक पातळीवर गतीमान करत शुक्रवारी (ता. आठ) दुपारच्या सुमारास दुसऱ्याला ताब्यात घेतल्याची माहिती वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांनी दिली. या रुग्णास उपचारासाठी कोव्हीड रुग्णालयात दाखल केले आहे. अद्यापही दोन पॉझिटीव्ह रुग्ण फरार असल्याने पोलिसांसह प्रशासनासमोर आव्हाण कायम आहे. तर याच भागात शुक्रवारी आणखी दोन पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर एक रुग्ण कौठा भागात आढळून आला आहे. 

रेल्वेतील हमाल, कामगारांना धान्य वाटप
पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्यावतीने माळटेकडी रेल्वेस्थानक व टेस्कॉमच्या गोदामात काम करणारे हमाल व रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी यांना मोफत धान्य कीटचे वाटप करण्यात आले.
लॉकडाऊनमुळे मालवाहतूक काही काळ बंद होती. याचा फटका रेल्वेस्थानक व इतर ठिकाणी काम करणाऱ्या हमालांनाही बसला. अशावेळी उद्योजक दिनेश बाहेती यांनी ही बाब पालकमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार अमिता चव्हाण व आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी तत्काळ या हमालांना मदत करण्याच्या सूचना दिनेश बाहेती यांना दिल्या. दिनेश बाहेती यांनी माळटेकडी रेल्वेस्थानकावरील हमाल व रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी तसेच टेस्कॉम येथील गोदामामध्ये काम करणारे हमाल यांना मोफत धान्य दिले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.