गिरगाव - वसमत तालुक्यातील गिरगाव येथील केळी सौदी अरेबियाला निर्यात करण्यात येत असून, केळीला जागेवरच एक हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे.
जिल्ह्यात सुमारे ६०० हेक्टरवर केळीचे पीक घेतले जाते. वसमत तालुक्यातील गिरगावसह परजना, खाजमापूर वाडी, सोमठाणा, पार्डी बुद्रूक, डिग्रस खुर्द आदी भागात इसापूर येलदरी धरणाच्या कालव्याच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी दोन हजार एकरांवर सुमारे केळी पिकाची लागवड केली आहे.
या भागातील केळी इराणसह आता सौदी अरेबिया या देशात निर्यात होत आहे. सध्या भावात घसरण झाल्याने एक हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे; तर स्थानिक बाजारपेठेमध्ये केळीला बाराशे रुपये प्रति क्विंटलचा दर आहे.
गेल्या वर्षी चार हजार केळीची लागवड केली होती. आता केळीचा माल तयार झाला असून, स्थानिक बाजारपेठेतील दरापेक्षा तीनशे रुपये प्रतिक्विंटल जास्तीचा दर एक्स्पोर्ट होणाऱ्या केळीला मिळत आहे.
- लक्ष्मण माळेवार, शेतकरी, गिरगाव.
सध्या देशात केळी पिकाच्या भावात घसरण होत आहे; पण परदेशात गिरगाव भागातील केळी पिकाला मोठी मागणी आहे. प्रति क्विंटल दीड हजार रुपयांचा दर मिळत आहे
-सुनील काढोदे, व्यापारी, मालेगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.